Shah Rukh Khan on Irrfan khan SAKAL
मनोरंजन

'इरफान म्हणालेला, हॉलीवूडकडे शाहरुख नाही', आठवणींमध्ये Shah Rukh Khan भावुक

इरफानच्या आठवणीत शाहरुख खान सुद्धा भावूक झाला.

Devendra Jadhav

Shah Rukh Khan on Irrfan: काही व्यक्ती गेल्यावर त्यांचं महत्व कळतं. त्या व्यक्तीची आठवण सतावते. आणि मनाला एक चुटपुट लागते. असाच एक व्यक्ती म्हणजे इरफान. २९ एप्रिल २०२० ला इरफानने या जगाचा निरोप घेतला.

इरफानच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीतलं कधीही भरून न येणारं नुकसान झालंय. एक अव्यक्त पोकळी निर्माण झाली आहे. इरफानच्या आठवणीत शाहरुख खान सुद्धा भावूक झाला.

(Shahrukh Khan is emotional in the memory of irrfan)

शाहरुख सध्या त्याच्या ट्विटरवर #AskSRK च्या माध्यमातून त्याच्या फॅन्सशी संवाद साधत आहे. शाहरुख सुद्धा जमेल तितकं सर्व फॅन्सच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं देत आहे.

एका फॅनने शाहरुखला इरफान बद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी शाहरुखने इरफानची आर्ततेने आठवण काढली. शाहरुख खानच्या फॅनने इरफानच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करून दिलीय.

फॅन म्हणाला.. दिग्गज अभिनेता इरफान खान सर एकदा म्हणाले होते "हॉलीवूडमध्ये शाहरुख खान नाही" तुला काय वाटत?. शाहरुखने दिलेलं उत्तर खूप भावुक करणारं आहे.

शाहरुख म्हणाला, मला त्याची खूप आठवण येते तो एक चांगला आणि लाडका मित्र होता.. अशा शब्दात शाहरुखने इरफानची आठवण काढली आहे.

कॅन्सरचं निदान झाल्याने वयाच्या ५३ व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला. शाहरुख खान आणि इरफानने बिल्लू सिनेमात एकत्र काम केलंय. हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झालेला.

याशिवाय फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख आणि इरफान यांनी एकमेकांच्या सिनेमांचं विडंबन केलं होतं. ते विडंबन प्रचंड लोकप्रिय झालेलं. शाहरुख आणि इरफान मध्ये खूप चांगली मैत्री होती.

शाहरुख खानचा पठाण सिनेमा २५ जानेवारीला रिलीज झाला. सिनेमात शाहरुख सोबतच जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण, डिंपल कपाडिया यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला. ५०० कोटी क्लबमध्ये दाखल होणार पठाण हा पहिला सिनेमा. पठाण नंतर शाहरुख जवान आणि डंकी सिनेमात अभिनय करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT