jackie tiger
jackie tiger 
मनोरंजन

टायगर-दिशाच्या नात्याबद्दल जॅकी श्रॉफ यांचा खुलासा, "वयाच्या २५ वर्षांपासून.."

स्वाती वेमूल

अभिनेत्री दिशा पटानी Disha Patani आणि अभिनेता टायगर श्रॉफ Tiger Shroff हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीत होत आहेत. मात्र या दोघांनी माध्यमांसमोर कधीच प्रेमाची कबुली दिली नाही. टायगर-दिशा जरी खुलेपणाने रिलेशनशिपची कबुली देणार नसले तरी ते परदेशात एकत्र सुट्टीवर जातात, वाढदिवस एकमेकांसोबत साजरा करतात, एकमेकांच्या कुटुंबीयांना भेट देतात, विविध कार्यक्रमांना किंवा पार्ट्यांना एकत्र हजेरी लावतात. टायगरचे वडील जॅकी श्रॉफ Jackie Shroff आणि बहीण कृष्णा श्रॉफ यांच्यासोबतही दिशाची चांगली गट्टी जमली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ हे टायगरच्या रिलेशनशिपबद्दल व्यक्त झाले. (Jackie Shroff opened up about Tiger Shroff Disha Patanis rumoured relationship)

'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "माझा मुलगा २५ वर्षांचा असल्यापासून डेट करू लागला आणि ते दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. भविष्यासाठी त्यांनी काय ठरवलंय हे मला माहित नाही. पण मला एक गोष्ट टायगरबद्दल माहित आहे की, तो कामाच्या बाबतीत खूप एकाग्र असतो. त्याला कामापेक्षा त्याची आई, बाबा, बहीण किंवा गर्लफ्रेंड कोणीही जास्त महत्त्वाचे नाही. त्याच्या आणि त्याच्या कामाच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही. कामाच्या बाबतीत असलेला त्याचा आत्मविश्वास खूप चांगला आहे."

याच मुलाखतीत टायगरची बहीण कृष्णासुद्धा उपस्थित होती. "एक बहीण म्हणून मला त्याची खूप काळजी असते. पण अखेर स्वत:चे निर्णय घेण्यासाठी तो समर्थ आहे. काय योग्य आहे आणि काय अयोग्य हे त्याला नीट माहित आहे आणि जोपर्यंत तो खूश आहे, तोपर्यंत आम्हीसुद्धा खूश आहोत. बहीण म्हणून त्याला कुठलाही सल्ला देण्याची गरज मला वाटत नाही. त्याच्या निर्णयांच्या बाबतीत तो खूपच ठाम आहे", असं कृष्णा म्हणाली.

नुकताच दिशाने तिचा वाढदिवस साजरा केला. हा खास दिवस साजरा करण्यासाठी ती टायगरच्या घरी गेली होती. कृष्णा आणि टायगरसोबतचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. दिशा आणि टायगरचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT