Quotation Gang Trailer Esakal
मनोरंजन

Quotation Gang Trailer: असेल हिंमत तर कोटेशन गँगचा ट्रेलर पाहून दाखवा! जॅकी श्रॉफ सनीनं तर...

'कोटेशन गँग'चा ट्रेलर पाहून आणि थ्रिलर अवतार पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही

Vaishali Patil

बॉलीवुडचा जग्गू दादा जॅकी श्रॉफचा गँगस्टर अवतार 80 च्या दशकापासून आजपर्यंत प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याचा भिडू हा शब्द थेट चाहत्याच्या काळजात भिडतो. 'कोटेशन गँग' या चित्रपटातून जॅकी श्रॉफचा पुन्हा तोच अवतारात दिसणार आहे. (Jackie Shroff Sunny Leone Starring Quotation Trailer Releases Story on Gang War)

सर्वात आश्चर्यकारक म्हणजे यात त्याच्यासोबत बोल्ड आणि हॉट मॉडेल अभिनेत्री सनी लिओनही दिसणार आहे. 'कोटेशन गँग'चा ट्रेलर पाहून आणि या दोघांचा थ्रिलर अवतार पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही.

लोकांच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक जॅकी श्रॉफ पुन्हा एकदा गँगस्टर अवतारात परतत आहे. मात्र यावेळी जॅकीचा अवतार खूपच थ्रिलर दिसत आहे तर दुसरीकडे सनी लियोनला आपण सोज्वळ आणि नाजूक अवचतारातच अभिनय करतांना पाहिलं पण आता या चित्रपटात तिचा लूक पाहिल्यानंतर ती सनी आहे यावर विश्वासचं बसणार नाही.

'कोटेशन गँग' हा एक क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून असे दिसते की मोठ्या पडद्यावर खूप हिंसाचार होणार आहे. 'कोटेशन गँग'च्या ट्रेलरमध्ये इतका हिंसाचार आहे की संपूर्ण व्हिडिओ पाहता येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सर्व पात्रांचे लूक देखील खूप भयानक आहेत. चित्रपटाची कथा एका गँगवारभोवती फिरतांना दिसते.

मुंबई, चेन्नई आणि काश्मीरमध्ये पसरलेल्या वेगवेगळ्या टोळ्यांची ही कथा आहे 'कोटेशन गँग' केरळमधील असलेल्या खऱ्या गुन्हेगारी टोळीवर आधारित आहे, जी टोळी 500 रुपयांसाठीही लोकांना मारायला तयार असते. या चित्रपटात महिला पात्रही टोळीप्रमुखांच्या भूमिकेत भयंकर हिंसा करताना दिसणार आहे.

तेव्हा सनी लिओनी अत्यंत भयानक अवतारात दिसतेय. ती शस्त्रे घेऊन दुसऱ्या टोळीच्या म्होरक्याला मारायला जाते आणि म्हणते - फक्त एका टोळीचा म्होरक्याच दुसऱ्या टोळीच्या म्होरक्याला मारू शकतो. 'कोटेशन गँग'च्या ट्रेलरमध्ये खूप हिंसाचार पाहायला मिळतो, त्यामुळे साहजिकच चित्रपटातही खूप हिंसा पाहायला मिळणार आहे.

'कोटेशन गँग' हा तमिळ चित्रपट असून तो मूळ भाषेसह हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे. विष्णू कन्नन, दिग्दर्शक तसेच 'कोटेशन गँग'चे निर्माता 'कोटेशन गँग'चे म्युझिक भारतातील प्रसिद्ध ड्रमर शिवमणी यांचे संगीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT