Jacqueline Fernandez appears before ED  Google
मनोरंजन

'कॉनमॅन' प्रकरणात जॅकलिन पुन्हा ईडीसमोर हजर, कसून झाली चौकशी

सुकेश चंद्रशेखरच्या २०० करोडच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनचं नाव समोर आल्यानंतर ती ईडीच्या चक्रव्यूहात चांगलीच अडकली आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या चक्रव्यूहात चांगलीच फसली आहे. तिच्या 'कॉनमॅन' सुकेश चंद्रशेखर प्रकरणातील अडचणी कमी होण्याच्या बदल्यात वाढतच चालल्या आहेत. सोमवारी २७ जून २०२२ रोजी,ईडीनं पुन्हा कॉनमॅन प्रकरणात जॅकलीनची कसून चौकशी केली आहे. ईडीनं(ED) आपल्यासमोर हजर राहायचे आदेश जॅकलिनला दिले होते. जॅकलिनला आज ईडीच्या कार्यालयातून बाहेर निघताना स्पॉट केलं गेलं. सुकेश चंद्रशेखरच्या २०० करोडच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनचं नावही समोर आलं होतं. त्यावेळी देखील ईडीनं जॅकलिनला यासंदर्भात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. अन् त्यावेळी जॅकलिननं आपलं म्हणणं मांडलं होतं.(Jacqueline Fernandez appears before ED)

कॉनमॅन प्रकरणात ईडीने जॅकलिनची याआधी दोन ते तीन वेळा चौकशी केलेली आहे. आता सुकेश चंद्रशेखर सोबतच्या तिच्या कथित मैत्री संदर्भातल्या काही गोष्टी समोर आल्यानंतर तिला यासंदर्भात पुन्हा चौकशीसाठी बोलावलं गेलं आहे. यासंदर्भात जॅकलिन आणि नोरा फतेहीनं साक्षीदार म्हणून आपलं म्हणणं ईडीसमोर याआधीच मांडलं आहे.

कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरवर २०० करोडची जबरदस्तीनं वसूली केल्याचा आरोप आहे. तर जॅकलिनवर आरोप आहे की तिने सुकेश कडून खूप महागडे गिफ्ट स्विकारले. ज्यामध्ये काही मांजरी,एक घोडा आणि इतर काही गोष्टींचा समावेश आहे.

चार्जशीटमध्ये या गोष्टींचा देखील खुलासा झाला होता की सुकेश चंद्रशेखरची एक जवळची सहकारी पिंकी ईरानीनं जॅकलिनची त्याच्याशी ओळख करुन दिली होती. आणि सुकेशनं पिंकी ईरानीच्या मदतीनेच जॅकलिनकडे हे महागडे गिफ्ट आणि मोठी रक्कम पोहचवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील ऐतिहासिक विधि महाविद्यालयात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाचं उद्घाटन

SCROLL FOR NEXT