Jacqueline-Sukesh: Conman Sukesh Chandrashekhar Wishes Bollywood Actress Jacqueline Fernandez on Her Birthday  Esakal
मनोरंजन

Jacqueline-Sukesh: 'ये मेरा प्रेम पत्र पढकर..', पुन्हा सुकेशचं तुरुंगातून जॅकलिनला लव्हलेटर..

जॅकलिन फर्नांडिसला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुकेशने एक प्रेमपत्र लिहिलं, ज्यामध्ये त्याने जॅकलिनला 'माय बेबी गर्ल', 'माय बोम्बा' असे अनेक शब्द त्याने वापरले आहेत.

Vaishali Patil

Conman Sukesh Chandrashekhar Wishes Jacqueline Fernandez on Her Birthday: महाठग सुकेश चंद्रशेखर हा 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली मंडोली तुरुंगात बंद आहे. सुकेशच्या केसमध्ये अनेक नव नवे आरोप होत असतात. तो देखील अनेकांवर आरोप करत असतो.

मात्र या घोटाळ्यातच बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच देखील नाव समोर आलं. जॅकलिनने हे आरोप फेटाळले तर सुकेशने देखील या प्रकरणावर जॅकलिन फर्नांडिसला पाठिंबा दिला आहे.

सुकेश तुरुंगात असूनही शांत बसलेला नाही. तो तिथूनही असं काही तरी करतो कि त्याची चर्चा रंगतेच. त्याने जेलमधून बऱ्याचदा जॅकलिनला प्रेमपत्र पाठवली आहेत. या पत्रातुन त्याने जॅकलिनसाठी त्याचे प्रेम व्यक्त केले आहे. आता देखील तसचं काहीतरी त्याने केलं आहे.

त्याने जॅकलिन फर्नांडिसला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुकेशने एक प्रेमपत्र लिहिलं, ज्यामध्ये त्याने जॅकलिनला 'माय बेबी गर्ल', 'माय बोम्बा' असे अनेक शब्द त्याने वापरले आहेत. 11 ऑगस्ट रोजी जॅकलीन फर्नांडिस तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त सुकेशने तिला हे प्रेमपत्र दिलं आहे.

सुकेशने त्याच्या प्रेमपत्रात लिहिले, “माझ्या प्रिय जगातील सर्वात सुंदर बोम्मा जॅकी (जॅकलीन फर्नांडिस). झाडावर हजारो फुले उमलतात पण त्यातील एक खास असत त्याचं प्रमाणे आयुष्यात हजारो आठवणी असतात, पण त्यातली एक आठवण खास असते. जी हृदयाला स्पर्श करते आणि तिच्या प्रेमात तुम्हाला वेडं करते.

या पत्रात तो पुढे लिहितो की, 'आज मी देवाकडे काहीतरी मागितलं आहे. त्यांच्यापुढं डोकं टेकवलं आहे. जगातील सर्व सुख मी तुझ्या पायाशी ठेवेन. तुझे सर्व दु:ख मी घेईल आणि तुझे प्रत्येक स्वप्न, प्रत्येक इच्छा पूर्ण हो अशी प्रार्थना करेल.

बार बार दिन ये आए… बार बार दिल ये गये.. तुम जिओ हजारों साल… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..माझं तुझ्यावर प्रेम आहे.” इतकच नाही तर त्याने स्वत:च्या हाताने जॅकलिनसाठी ग्रीटिंग कार्डही तयार केले आहे.

सुकेशने या पुर्वी देखील जॅकलिनसाठी प्रेमपत्र पाठवले आहेत. त्याने या वर्षी मार्चमध्ये वाढदिवशी जॅकलिनला एक पत्र लिहून तो तिला खूप मिस करत असल्याचं म्हटलं होते. यानंतर एप्रिलमध्ये सुकेशचे जॅकलिनसाठी लिहिलेले पत्रही समोर आले होते. त्यानंतर मे महिन्यातही त्याने अनेकदा जॅकलिनला पत्र पाठवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT