Jacqueline Fernandez Instagram
मनोरंजन

Jacqueline Fernandez: 'मी तिला एकदाच मुबंईत भेटलो आणि...', जॅकलिनविषयी फ्रेंच संगीतकाराची मोठी कबुली

फ्रेंच संगीतकार डीजे स्नेक हे नाव सध्या जॅकलिन फर्नांडीससोबत जोडलं जात आहे.

प्रणाली मोरे

Jacqueline Fernandez: सनशाईन गर्ल जॅकलीन फर्नांडिस तिचा अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखली जात असून, तिचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. आता या फॅन क्लबमध्ये सुप्रसिद्ध संगीत निर्माता डीजे स्नेकचे नाव सामील झाले आहे. त्यानं जॅकलिनविषयी मोठी कबुली दिली आहे. (Jacqueline Fernandez fan, French Music Director connection)

डीजे स्नेक हा एक सुप्रसिद्ध फ्रेंच संगीत निर्माता आहे ज्याने नेहमीच आपल्या संगीताने चाहत्यांना वेड लावले आहे. एका मुलाखतीदरम्यान, त्याला कोणासोबत काम करायला आवडेल असे विचारले गेले होते. तेव्हा तो म्हणाला, "मी भारतीय अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा प्रचंड चाहता आहे आणि मला भविष्यात तिच्यासोबत काम करायला आवडेल."

Jacqueline Fernandez fan, French Music Director And DJ Snake connection

तो पुढे म्हणाला, “रणवीर सिंग हे देखील एक नाव आहे ज्याच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. मी आता काही भारतीय संगीतकारांच्या संपर्कात आहे आणि आम्ही काही रोमांचक संकल्पनांवर एकत्रित काम करण्याच्या दृष्टीने चर्चा करत आहोत."

जॅकलीन निश्चितपणे डीजे स्नेकच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अव्वलस्थानी आहे. पुढे तो म्हणाला, "मला जॅकलीन फर्नांडिसला एकदा मुंबईत भेटण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर मी तिचा खूप मोठा चाहता बनलो. याशिवाय, मी शाहरुख खानचा देखील खूप मोठा चाहता आहे'', असेही तो म्हणाला.

जॅकलीनच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर नुकतीच 'राम सेतू' मध्ये ती दिसली होती तर तिच्याकडे सध्या 'सर्कस' हा मोठा सिनेमा आहे आणि अलीकडेच 'क्रॅक' ची देखील घोषणा केली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT