Jacqueline Fernandez regular bail plea hiring in patiala house court in money laundring case Google
मनोरंजन

Money Laundring Case: दिवाळीचा मुहूर्त जॅकलिनसाठी ठरेल का लकी? अभिनेत्रीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस कडून दाखल करण्यात आलेल्या नियमित जामीन अर्जावर आज २२ ऑक्टोबर रोजी पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी आहे.

प्रणाली मोरे

Jacqueline Fernandez: 200 करोडच्या फसवणूकीच्या प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस कडून दाखल करण्यात आलेल्या नियमित जामीन अर्जावर आज २२ ऑक्टोबर रोजी पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी आहे. पटियाला हाऊस कोर्टात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दुपारी २ वाजता हजर राहणार आहे. पटियाला हाऊस कोर्टाकडून जॅकलिनला मिळालेल्या जामीनाचा ईडी कदाचित विरोधही करू शकते. गेल्या सुनावणी दरम्यान कोर्टानं जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर केला होता.(Jacqueline Fernandez regular bail plea hiring in patiala house court in money laundring case)

कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या २०० करोडच्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिन सहआरोपी आहे. या प्रकरणात ईडी ने १७ ऑगस्टला एक चार्जशीट दाखल करत जॅकलिनला त्यात आरोपी म्हणून दर्शवलं होतं. यानंतर कोर्टानं तिला समन्स पाठवलं होतं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून नाव समोर आल्यानंतर जॅकलिनच्या वकीलांनी तिच्या जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

त्यादरम्यान जॅकलिन फर्नांडिसला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातर्फे अंतरिम जामीन दिला गेला होता. पण या केस प्रकरणात आता जॅकलिनला नियमित जामीन मंजून व्हावा यासाठी सुनावणी होणार आहे. एका इंग्रजी न्यूज पोर्टलला मिळालेल्या माहितीनुसार जॅकलिन फर्नांडिसच्या वकीलांनी सांगितले आहे की,शनिवारी २२ ऑक्टोबर रोजी आम्ही दिल्लीच्या विशेष कोर्टात हजर राहणार आहोत. त्यावेळी जॅकलिनच्या नियमित जामीन अर्जावर अंतिम निर्णय देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. माहितीसाठी इथं फक्त नमूद करतो की, गेल्या वर्षभरापासून कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात नाव आल्यामुळे जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे.

ईडीनं सुकेश चंद्रशेखर केस प्रकरणात जॅकलिनची कसून चौकशी केली आहे. इडीच्या चौकशी दरम्यान जॅकलिननं त्यांना पू्र्ण सहकार्य केल्याचं निदर्शनास आलं आहे. ईडीच्या चौकशी दरम्यान एकदा जॅकलिनने सांगितलं होतं की ती सुकेशवर तिचं प्रेम होतं. इतकंच नाही तर तिला त्याच्याशी लग्न देखील करायचं होतं. आता जॅकलिनला या प्रकरणात नियमित जामीन मिळतो की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT