Sukesh chandrashekhar news  esakal
मनोरंजन

Sukesh Case: जॅकलीनसाठी 'टाईट फिल्डिंग', प्रश्नांची भलीमोठी यादी तयार

दोनशे कोटींचा गैरव्यवहार करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरसोबत असलेली मैत्री जॅकलीनला चांगलीच महागात पडल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jacqueline Fernandez news: बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीनच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोनशे कोटींचा गैरव्यवहार (bollywood news) करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरसोबत असलेली मैत्री जॅकलीनला चांगलीच महागात पडल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडीनं (ED News) जॅकलीनभोवती सुरक्षारक्षक तैनात केल्याचे दिसून आले आहे. तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. आज जॅकलीनला ईडीनं बोलावणं धाडलं असून तिची चौकशी होणार आहे. सुकेशकडून महागड्या वस्तू घेतल्याचा तसेच (social media viral news) त्याच्याशी संपर्क ठेवल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

याप्रकरणी जॅकलीनच्या कुटूंबियांवर देखील वॉच ठेवण्यात आला आहे. त्यांना देखील सुकेशनं महागड्या वस्तू पाठवल्या होत्या. असे तपासातून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी जॅकलीनची चौकशी करण्यात आली होती. त्यात तिनं आपल्याला सुकेशकडून मिळालेल्या वस्तुंविषयी माहिती दिली होती. अलिशान घर, भेटवस्तु हे सारं जॅकलीनकडे कसे आले, बॉलीवूडमध्ये तिची कमाई किती, मुंबईमध्ये दोन घरं, याशिवाय परदेशात देखील मोठी गुंतवणूक असल्याचे दिसून आले आहे. यानंतर ईडीनं जॅकलीनच्या भोवती पहारा वाढवत तिच्यावर वॉच ठेवण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.

आता दिल्ली पोलीस जॅकलीनची चौकशी करणार आहे. तिला आज चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिला जे प्रश्न विचारायचे आहेत त्याची भली मोठी यादी तयार केली आहे. दिल्लीची आर्थिक गुन्हे शाखा आता जॅकलीनची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यान न्युज एजन्सीला दिलेल्या माहितीत असे सांगितले की, जॅकलीनची आज चौकशी होणार असून त्यातून मोठी माहिती समोर येण्याची शक्य़ता आहे. तिच्यावर जे आरोप आहेत त्याची तीव्रता मोठी आहे. त्यामुळे येत्या काळात नवीन माहितीनुसार सुकेश केससंदर्भात कोणती कारवाई करायची याची दिशा स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Hotel Fire : कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; चिमुकल्यासह ९ जणांचा मृत्यू, मध्यरात्री अग्नितांडवाने शहर हादरले

Marathi News Live Updates : सर्पदंश अधिसूचित आजार; प्रत्येक घटनेची नोंद बंधनकारक

Ambap School Tragedy: शाळेत हुशार, खेळात तरबेज ‘धनराज’ची एक्झिट जिव्हारी; क्रीडांगणावर सराव करताना पडल्याचे निमित्त

Shiv Sena प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टरूममध्ये अचानक गोंधळ; कपिल सिबल म्हणाले, “नाचण्याची वेळ झाली”, CJI सूर्यकांतही बोलले

Beed Hospital Case: डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे ‘आईपण’ हिरावले; बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार, महिलेची पुण्यात मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT