मनोरंजन

मराठी नाटकाला जगभरात पोहोचवण्यासाठी जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची स्थापना...

दिलीप यादव

मुंबई : चांगल्या व्यावसायिक नाटकांच्या निर्मिती प्रक्रियेत संघातील निर्मात्यांना पाठिंबा देणे, नाटक व्यवसाय मोठा होण्याच्या दृष्टीने पाऊल उचलणे,  नाटक मुंबई-पुण्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्र, इतर राज्यात व परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयोग होण्यासाठी प्रयत्नशील राहणे, अशी अनेक उद्दिष्टं घेऊन जागतिक जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची स्थापना करण्यात आली आहे. या निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर तर उपाध्यक्ष म्हणून महेश मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रकांत लोकरे खजिनदार तर दिलीप जाधव कार्यवाह व श्रीपाद पद्माकर सहकार्यवाह म्हणून काम पाहणार आहेत.

मराठी व्यावसायिक निर्माता संघातून बाहेर पडलेल्या सभासदांनी आता एकत्र येऊन ही नवीन संघटना स्थापन केली आहे. ही संघटना जागतिक पातळीवरील रंगकर्मींसाठी काम करणार आहे. याबाबत आज एक पत्रकार परिषद ऑनलाईन घेण्यात आली. त्यामध्ये निर्माता अमेय खोपकर, निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते अनंत पणशीकर, निर्माते दिलीप जाधव, गायक अवधूत गुप्ते, निर्माता व अभिनेता सुनील बर्वे, अभिनेता सचित पाटील, निर्माते व दिग्दर्शक राकेश सारंग, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, निर्माता लता नार्वेकर, अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, अभिनेत्री विशाखा सुभेदार, अभिनेत्री तेजश्री प्रधान, दिग्दर्शक राजेश देशपांडे, अभिनेता पुष्कर श्रोत्री यांच्यासह अनेक नाट्यकर्मी सहभागी झाले होते.

या वेळी महेश मांजरेकर म्हणाले, की आतापर्यंत कुणी काय केले हे सांगत बसण्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत, हे सांगण्यात आम्हाला रस आहे. एक निश्चित कार्यक्रम घेऊन आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत. त्यांनी काय केले किंवा नाही हे सांगण्यात आम्हाला अजिबात रस नाही. आम्ही आमचे विचार घेऊन वाटचाल करणार आहोत.सर्वांचीच नाटके चालावीत. सगळ्यांच्या नाटकांनी उत्तम व्यवसाय करावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले.  

अमेय खोपकर म्हणाले, की एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून नाट्य संघाचा अध्यक्ष नाही तर मागील पाच-सहा वर्षांपासून नाट्य व्यवसायात आहे. नाट्य संघाशी माझा जवळचा संबंध आहे आणि नाटक हा माझा व्यवसाय आहे. आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाणार आहोत. कोणाकडून कसलीही तक्रार यायला जागा ठेवणार नसल्याचे सुतोवाच त्यांनी केले.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोनालिसा अल्पवयीन? व्हायरल गर्लच्या जन्मतारखेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

IND vs WI 3rd ODI: भारतीय संघात अचानक बदल, CSK च्या स्टार खेळाडूला बोलावलं; तिसऱ्या वन डेत Playing XI मध्ये बदल निश्चित

Supreme Court: फटाके फोडण्यावर सरसकट बंदी नाही; वेळेचे बंधन पाळणे आवश्‍यक असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट

बुध-राहूच्या नक्षत्र संयोगामुळे या ६ राशींचं नशीब फळफळणार; करिअर, व्यवसाय आणि धनलाभासाठी पुढील १२ दिवस ठरणार खास

Latest Marathi News Live Update : कन्नड तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट; हातातोंडाशी आलेली खरीपाची पिके डोळ्यांसमोर जळून खाक

SCROLL FOR NEXT