Jai Jai Swami Samartha, Jai Jai Swami Samartha episode update, Jai Jai Swami Samartha, vijaya babar SAKAL
मनोरंजन

Jai Jai Swami Samartha: आणि चंद्राचा प्रवास संपला.. जय जय स्वामी समर्थ मधली अभिनेत्री झाली भावुक

चंदा या भुमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं

Devendra Jadhav

raJai Jai Swami Samartha News: सध्या कलर्स मराठीवर जय जय स्वामी समर्थ मालिका चांगल्या वळणावर आहे. जय जय स्वामी समर्थ हि पौराणिक मालिका कलर्स मराठीची आघाडीची मालिका आहे जी चांगल्या TRP मुळे चर्चेत आहे.

मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा प्रवास आता संपलाय. ती म्हणजे मालिकेतील चंदाची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर.

विजयाने सोशल मीडियावर तिचे मालिकेतल्या अखेरच्या सीन्सचे फोटो पोस्ट केले आहेत.

(Jai Jai Swami Samartha fame marathi actress vijaya babar gets emotional after her shooting is finally over)

विजयाने सोशल मीडियावर तिच्या फेअरवेलचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडिओत विजयासाठी खास केक आणला होता.

याशिवाय तिच्यासाठी मालिकेतल्या सर्व कलाकारांनी खास सरप्राईज सेलिब्रेशन केलं. विजयाने सर्वांसोबत तिच्या शूटिंगचा शेवटचा दिवस साजरा केला. यावेळी जय जय स्वामी समर्थच्या टीमने भेटवस्तू म्हणून विजयाला फोटोफ्रेम भेट दिली.

विजयाने सर्वांचे आभार मानताना पोस्ट लिहिली की.. आज जय जय स्वामी समर्थ या मलिकेतला चंदाचा प्रवास संपला. पण खऱ्या अर्थाने माझा प्रवास सुरू झाला. माझ्या स्वप्नांची सुरूवात या मालिकेपासुन झाली याचा मला खुप आनंद आहे.

Thank you so much कलर्स मराठी & Camsklub Studio.. राकेश सर आणि संगीत मॅडम तुम्ही मला ही संधी दिली. अशी पोस्ट लिहून विजयाने सर्वांना धन्यवाद दिले आहेत.

सध्या पौराणिक मालिकांचे सत्र जोरदार सुरू आहे. प्रत्येक वाहिनीवर किमान एक तरी पौराणिक चारित्रावर आधारित मालिका सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठी वरील 'जय जय स्वामी समर्थ'..

या मालिकेतून अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची चरित्रगाथा सांगण्यात आली आहे. ही मालिका सध्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली आहे.

मालिकेत विजया साकारत असलेल्या चंदा या भुमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. आता विजयाच्या आगामी प्रोजेक्टसची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT