Rajinikanth visits Badrinath Temple:  Esakal
मनोरंजन

Rajinikanth visits Badrinath Temple: 'जेलर'च्या कमाईनं थलायवा खुश! रजनीकांत पोहचले बद्रीनाथ मंदिरात

Vaishali Patil

Rajinikanth visits Badrinath Temple: सुपरस्टार रजनीकांत सध्या त्याच्या 'जेलर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'जेलर' चित्रपट 10 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

एकीकडे गदर2 आणि OMG2 असे सिनेमे असतांना सुद्धा रजनीचा जेलर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.

या चित्रपटावर प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. जेलरला मिळाले प्रेम आणि यश हे अविश्वसनीय आहे. आजही रजनीची जादू तितकीच आहे हे या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहिल्यानंतर कळते.

जेलरच्या मिळालेल्या यशानंतर रजनीकांत शनिवारी उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. त्याने बद्रीनाथ धाम येथे पोहचल्यावर प्रार्थना केली आणि संध्याकाळच्या आरतीलाही हजेरी लावली.

रजनीने यावेळी निळा शर्ट आणि ट्राउजर परिधान केला होता. यासह, शाल परिधान करत पांढऱ्या स्नीकर्ससह रजनीकांतने त्याचा लुक पुर्ण केला होता. सध्या रजनीकांतचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बद्रीनाथचे दर्शन घेतल्यानंतर रजनीने सांगितले की, देवाचं दर्शन घेतल्यानंतर त्याचे मन तृप्त झाले आणि तो भारावून गेले आहे. या व्हायरल व्हिडिओत त्याला चाहत्यांच्या जमावाने घेरले आहे. यावेळी पोलिस बंदोबस्त देखील दिसत आहे.

जेलरबद्दल बोलायचं झालं तर हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन नेल्सन यांनी केले आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 48 कोटींची रेकॉर्डब्रेक केली तर आत्तापर्यंत जेलरने बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात 143 कोटी कमावले आहेत.

जेलर हा रजनीकांत यांचा 169 वा चित्रपट आहे. जेलरमध्ये तमन्ना भाटिया, मोहनलाल, जॅकी श्रॉफ आणि शिवा राजकुमार यांनीही कॅमिओ भूमिका केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT