Jalegi tere baap ki: Adipurush brutally trolled for cringe Hanuman dialogue  sakal
मनोरंजन

Adipurush: जलेगी भी तेरे बाप की.. हनुमानाच्या तोंडी असले डायलॉग? 'आदिपुरुष'वर भडकले प्रेक्षक

आदिपुरुष पुन्हा वादात...

नीलेश अडसूळ

Adipurush Trolls for hanuman dialouge: सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट अखेर रिलीज झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट टीजर रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

त्यानंतर मध्यंतरी ट्रेलर पाहून परिस्थिती जरा सुधारली आणि लोकांमध्ये पुन्हा आदिपुरुषची क्रेझ निर्माण झाली. पण अगदी सकाळी लवकर उठून चित्रपटाला गेलेल्या आणि गर्दी करून आदिपुरुष पाहणाऱ्या सर्वच प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला आहे.

कालपासून या चित्रपटावर प्रचंड टीका होत आहे. चित्रपटातील व्हिएफएक्स, पात्रांचे कपडे, रावणाचा अवतार सगळ्यावरच लोक सडकून टीका करत आहे. आता चित्रपटातील हनुमानाचे संवादही समोर आले आहे.

हनुमनाच्या तोंडी असे छपरी डायलॉग का घातले म्हणून प्रेक्षकांनी निर्मात्यांना चांगलेच धारेवर धरले आहेत.

( Jalegi tere baap ki: Adipurush brutally trolled for cringe Hanuman dialogue )

या चित्रपटातील हनुमनाच्या संवादावरून आता चांगलाच वाद पेटला आहे. हनुमानाचे संवाद हे राम कथेला शोभा देणारे नही असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले आहे. चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असलेले सामान्य भाषेतील संवाद ऐकून प्रेक्षकांना राग अनावर झाला आहे.

सोशल मीडियाद्वारे या संवादावरुन ‘आदिपुरुष’ला ट्रोल करण्यात येत आहे. 'कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की..'' असा संवाद हनुमानाच्या तोंडी आहे.

हा संवाद ऐकून प्रेक्षकांनी अक्षरशः संताप व्यक्त केला आहे. . हनुमानाचा असा संवाद कसा काय असू शकतो?, तो हनुमान आहे कुणी छपरी नाही.., देवाच्या तोंडी असे डायलॉग देताना किमान देवाला ताइर घाबरा.. अशा शब्दात प्रेक्षकांनी समाचार घेतला आहे.

त्यामुळे हा चित्रपट आता चर्चेचा नाही तर टीकेचा विषय झाला आहे. ‘आदिपुरुष’वर सोशल मीडियावर अक्षरशः टोळ धाड उठली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांचा चांगलाच अपेक्षाभंग केला आहे.

या चित्रपटात प्रभास श्रीराम राम, क्रिती सेनॉन सीता आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहेत. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT