Janhvi kapoor reveal shocking secret of her mother and father, Google
मनोरंजन

Janhvi Kapoor: बोनी कपूरमुळे श्रीदेवीचा जीव होता धोक्यात..,जान्हवीनं सांगितलं शॉकिंग सीक्रेट

जान्हवी कपूरनं 'मिली' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतील वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Janhvi kapoor :बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं आपली आई श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्याविषयी एक हैराण करणारा खुलासा केला आहे. बोनी कपूरनं आपल्या एका मुलाखतीत सांगितलं की एक वेळ माझ्या आईच्या आयुष्यात अशी आली होती की तिनं पूर्णपणे मांसाहाराचा त्याग केला होता,ती शाकाहरी बनली होती. खरंतर त्यावेळी तिचं शरीर खूप कमजोर बनलं होतं,डॉक्टरांनी सल्ला दिला होता की मांसाहार करा, तरी ती कोणाचं ऐकत नव्हती. याचं कारण होते बोनी कपूर,माझे वडील. आईनं त्यांची धुम्रपानाची सवय सुटावी म्हणून नाना-तऱ्हेचे प्रयत्न केले. पप्पांमुळे आईनं स्वतःचा जीव धोक्यात घातल्याचं जान्हवीनं मुलाखतीत म्हटलं आहे. (Janhvi kapoor reveal shocking secret of her mother and father)

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे लग्न १९९६ साली झालं होतं. जान्हवी कपूर श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मोठी मुलगीआहे. खुशी कपूर ही आणखी एक मुलगी या दाम्पत्याला आहे. खुशी देखील झोया अख्तरच्या सिनेमातून लवकरच पदार्पण करत आहे. एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली की, एक काळ होता की तिचे वडील बोनी कपूर यांना धुम्रपानाची सवय लागली आणि काही केल्या ती सवय सुटत नव्हती.

जान्हवी कपूर म्हणाली,''खूप आधीची गोष्ट आहे,मला आठवतंय की आम्ही जुहूला रहात होतो, तेव्हा पप्पा खूप धुम्रपान करायचे. मला वाटतं, ही गोष्ट तेव्हाची, जेव्हा ते 'नो एन्ट्री', 'वॉंटेड' सिनेमाचं शूट करत होते. मी आणि खुशी रोज पप्पांची सिगारेट लपवून ठेवायचो किंवा सिगारेट खराब करुन टाकण्यासाठी नवनवीन शक्कल लढवायचो. आम्ही एकतर त्यांची सिगारेट कापून टाकायचो किंवा त्यावर टूथपेस्ट लावायचो. पण काहीच शक्कल काम करत नव्हती,तेव्हा आईपण(श्रीदेवी) पप्पांसोबत यावरनं खूप भांडायची''.

जान्हवी पुढे म्हणाली,''तेव्हा आईनं मांसाहराचा त्याग केला,खरंतर तेव्हा तिला शरीर स्वास्थ्यासाठी डॉक्टरनं मांसाहार करायचा सल्ला दिला होता. पण तिनं मात्र ठरवलं होतं,जोपर्यंत पप्पा(बोनी कपूर) धुम्रपान सोडणार नाहीत तोपर्यंत ती मांसाहार करणार नाही. तेव्हा पप्पा तिच्यासमोर हातापाया पडायचे,तिनं मांसाहार करावा म्हणून . कारण ते तिच्या हेल्थ विषयी चिंतेत होते. त्यानंतर वडलांनी धु्म्रपान सोडलं खरं पण आई मात्र ते पहायला राहिली नाही. एके दिवशी ते मला म्हणाले, ''तुमच्या आईला वाटायचं मी धुम्रपान सोडावं. तेव्हा मी सोडू शकलो नाही. पण आता यापुढे मी धुम्रपान करणार नाही''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT