Janhvi Kapoor Bollywood Actress Shikhar Pahadiya viral  esakal
मनोरंजन

Janhvi Kapoor : वाढदिवसाच्या दिवशी जान्हवीनं दिली गोड बातमी! 'ती आता...'

बॉलीवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी म्हणून जान्हवी सगळ्यांना माहिती आहे.गेल्या काही वर्षांपासून जान्हवीनं तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Janhvi Kapoor : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या वेगळ्या अंदाजासाठी आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. सध्या तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा आहे. यासगळ्यात तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये जान्हवीचा लूक चाहत्यांना खूप काही सांगून जाणारा आहे.

बॉलीवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी म्हणून जान्हवी सगळ्यांना माहिती आहे.गेल्या काही वर्षांपासून जान्हवीनं तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर जान्हवीचा चाहतावर्ग मोठा आहे. चाहत्यांकडून जान्हवीच्या फोटोवर येणाऱ्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. जान्हवीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जान्हवीचा एक व्हिडिओ फोटो व्हायरल झाला आहे.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

जान्हवीच्या व्हायरल झालेल्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर तिला नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. एकानं तर जान्हवी आम्हाला माहिती आहे तो तुझा बॉयफ्रेंड आहे.तेव्हा तू काही चेहरा लपवू नकोस. अशा कमेंट्स केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून जान्हवीच्या रिलेशनशिपविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.

सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, जान्हवीचा बॉयफ्रेंड हा शिखर पहाडिया आहे. त्यानं तिच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरील कमेंटस भन्नाट आहेत. गेल्या काही दिवसांपासून जान्हवीचे वेगवेगळे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हाच नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले होते.

जान्हवीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती लवकरच एनटीआर सोबत टॉलीवूडमध्ये डेब्यु करणार आहे. तिनं जन्मदिनाच्या दिवशी ही बातमी सांगितली आहे. ही गोड बातमी दिल्यावर चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. सध्या तरी या चित्रपटाला एनटीआर ३० असे म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाला मोठं वळण! आरोपीबाबत बाल न्याय मंडळाचा महत्त्वाचा निर्णय

Shubhanshu Shukla Return Video : हॅलो वर्ल्ड! अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतरचा पहिला व्हिडिओ व्हायरल..

Raigad News: मुसळधार पावसाची ठिकाणं प्रशासनाकडून दुर्लक्षित, विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर सुट्टीचे आदेश जारी; पालक संतप्त

Shubhanshu Shukla: आईवडिलांच्या डोळ्यात पाणी, पंतप्रधानांना अभिमान...; शुभांशू शुक्ला पृथ्वीवर उतरताच प्रतिक्रिया काय होती?

Sangli Researcher : संशोधक घडत नसतो, घडवावा लागतो, सांगलीतील चहावाल्याचं पोरगं बनतंय टेक्नोलॉजी मास्टर; ड्रंक अँड ड्राईव्हला बसणार चाप

SCROLL FOR NEXT