Javed Akhtar Bollywood Lyricist Israel Hamas esakal
मनोरंजन

Javed Akhtar : 'आयुष्याचा खेळ संपविण्यासाठी....'! जावेद अख्तर इस्त्राईल-हमासच्या युद्धावर पुन्हा बोलले

अख्तर यांनी गेल्या चार वर्षांपासून स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

युगंधर ताजणे

Javed Akhtar Bollywood Lyricist Israel Hamas : बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत जे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांसाठी ओळखले जातात. बॉलीवूडमधील सर्वाधिक वादग्रस्त सेलिब्रेटी म्हणून नाव सांगायचे झाल्यास पहिले नाव कंगनाचे घ्यावे लागेल. त्यानंतर स्वरा, तापसी, जावेद अख्तर, नसिरुद्दीन शहा, रत्ना पाठक शहा, जया बच्चन देखील चर्चेत असतात.

अख्तर यांनी गेल्या चार वर्षांपासून स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अख्तर यांची गीतं, त्यांचे लेखन हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. अख्तर यांची पटकथा बॉलीवूडमध्ये लोकप्रिय ठरली. त्या पटकथेनं बॉलीवूडला अनेक दिग्गज अभिनेते दिले. त्यात अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावाचा समावेश आहे. आता जावेद अख्तर यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सडेतोडपणाचा प्रत्यय करुन दिला आहे.

Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप आणि उत्तर भारतात धक्के असं का?

यापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पाकिस्तानात गेलेल्या अख्तर यांनी पाकिस्तानला देखील चांगलेच सुनावले होते. त्या व्हिडिओची साऱ्या देशभर चर्चा होती. यामुळे अख्तर लाईमलाईटमध्ये आले. काही दिवसांपूर्वी अख्तर यांनी हमास-इस्त्राईल विषयावर प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

आता अख्तर यांनी पुन्हा एकदा इस्त्राईल आणि हमास युद्धावर दिलेल्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अख्तर यांनी आता त्या युद्धावर दिलेली जी प्रतिक्रिया आहे ती भलतीच तिखट आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आयुष्याचा खेळ संपविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. आपण नेमकं कोणत्या दिशेनं जात आहोत हे कळत नाही का असा प्रश्न पडतो.

अख्तर यांनी इस्त्राईलवर तोफ डागली आहे. मात्र अनेक नेटकऱ्यांना ते आवडलेलं नाही त्यांनी अख्तर यांच्यावर टीका केली आहे. अख्तर यांनी आता जी पोस्ट शेयर केली आहे त्यामध्ये काही फोटो शेयर केली आहे. त्यात मंगळ ग्रहाचा शोध घेण्यासाठी हजारो कोट्यवधी रुपये खर्च केले आहे. दुसरीकडे जिथं मानवी वस्ती आहे तिथे ती नष्ट करण्यासाठी बॉम्बहल्ले केले जात आहे. अशा शब्दांत त्यांनी इस्त्राईलवर टीका केली आहे.

मला एक कळत नाही तुम्ही लोकं हमासवर बंधनं किंवा दबाव का आणत नाही, त्यामुळे इस्त्राईलच्या ताब्यात जी बंदीवान आहेत त्यांना ते सोडून देतील. पण असे होताना दिसत नाही. अशानं परिस्थिती आणखी चिघळताना दिसत आहे. असेही निरीक्षण अख्तर यांनी नोंदविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT