kangna ranaut sakal media
मनोरंजन

कंगणा राणावतने जावेद अख्तर यांच्या विरोधात दाखल केली फौजदारी फिर्याद

सुनिता महामुनकर

मुंबई : गीतकार जावेद अख्तर (Javed akhtar) यांनी केलेल्या मानहानीच्या खटल्यात आज अखेर अभिनेत्री कंगना राणावतने (kangna ranaut) अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात (Andheri court) हजेरी लावली. सुनावणीला हजर झाली नाही तर अजामीनपात्र वॉरंट (Non bailable warrant) काढण्याचा इशारा न्यायालयाने तिला यापूर्वी दिला होता. दरम्यान, आता कंगनानेही अख्तर यांच्या विरोधात न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली आहे.

अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. यामध्ये दंडाधिकारी न्यायालयाने अनेकदा कंगनाला हजर राहण्याचे समन्स दिले होते. मात्र तिने खटल्यात हजेरी लावली नाही आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र उच्च न्यायालयाने तिची याचिका नुकतीच नामंजूर केली. त्यामुळे आज ती सुनावणीला हजर झाली. मात्र संबंधित न्यायालयावर माझा विश्वास नाही, त्यामुळे अन्य न्यायालयात खटला वर्ग करावा, अशी मागणी तिच्या वतीने वकील रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयात केली.

तसेच कंगनाने अख्तर यांच्या विरोधात स्वतंत्र तक्रार न्यायालयात केली आहे. अख्तर यांनी काही वर्षांपूर्वी अभिनेता ह्रतिक रोशनच्या प्रकरणात त्यांच्या घरी बोलवून मला आणि माझ्या बहिणीला धमकावले, असा आरोप यामध्ये केला आहे. त्यावेळी जावेद यांच्या वयाचा मान राखून मी तक्रार केली नाही, मात्र आता ते मला न्यायालयात लढा देत आहेत, त्यामुळे माझ्या कुटुंबाची परवानगी घेऊन मी तक्रार केली आहे, असा दावा यामध्ये केला आहे. धमकावणे, खंडणी असे आरोप यामधील केले आहेत. यावर दंडाधिकारी न्यायालयात ता 1 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

अंधेरी न्यायालयात आज अख्तर आणि कंगना दोघेही हजर होते. कंगनाची तब्येत ठीक नाही, पण न्यायालयाने इशारा दिला होता म्हणून तिने हजेरी लावली, मात्र तिचे वकील हजर असताना तिने हजर राहण्याची आवश्यकता नव्हती, त्यामुळे हा खटला अन्य न्यायालयात वर्ग करावा, अशी मागणी तिच्या वतीने करण्यात आली आहे. यावर ता 15 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांच्यावर आरोप केले आहेत. ही मुलाखत वायरल झाली असून लाखो हिटस मिळाल्या आहेत. मात्र तिने केलेले आरोप तथ्यहिन आहेत असा दावा करून अख्तर यांनी अंधेरी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

SCROLL FOR NEXT