Javed Akhtar  Team esakal
मनोरंजन

अख्तर बोलले, ट्रोल झाले, 'सरकारचं कौतूक पडलं महागात'

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी आपआपली भूमिका मांडली आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर (javed akhtar ) हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखलेही जातात. सध्या ते चर्चेत आले आहे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी सोशल मीडियावर केलेले व्टिट. राज्यात कोरोनाचा (Corona pandemic situation) संसर्ग जोरदार प्रमाणात सुरु आहे. अशावेळी कोरोनाचा हा प्रभाव रोखण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. त्यावर अख्तर यांनी आपली भूमिका मांडली आहे. मात्र त्यामुळे त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे.

अख्तर (javed akhtar ) यांनी महाराष्ट्र सरकार आणि बीएमसीच्या समर्थनार्थ एक व्टिट (Tweet) केले आहे. ते व्टिट ज्यावेळी व्हायरल झाले त्यानंतर अख्तर यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली. संपूर्ण देश कोरोनाशी झुंजत असताना राज्य आणि केंद्र सरकारमध्येही अनेक गोष्टींवरुन वाद रंगत आहे. त्यावर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी आपआपली भूमिका मांडली आहे. त्यात अख्तर यांचाही समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात सर्वप्रथम लॉकडाऊनची घोषणा केली. त्यावर अख्तर यांनी मत व्यक्त केलं आहे.

अख्तर (javed akhtar ) म्हणाले, मला एक गोष्ट माहिती आहे ती म्हणजे इतरांना महाराष्ट्राकडून धडे घेण्याची गरज आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिका ही कोरोनाशी जीव तोडून लढत आहे. यानंतर काही युझर्स नाराज झाले आणि त्यांनी अख्तर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युझर्सनं लिहिलं आहे की, सर सर्वात जास्त मृत्यप हे महाराष्ट्रातच झाले आहेत. तर दुस-यानं लिहिलं आहे की, तुम्ही यात देखील काही वेगळं शोधाल आणि त्याविषयी लिहालं. आम्ही काय शिकायचं यापासून. या शब्दांत त्या नेटक-यानं टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT