jawan box office collection day 2 shah rukh khan nayanthara vijay sethupati atlee  SAKAL
मनोरंजन

Jawan Box Office Collection Day 2: दोन दिवसात सेंच्यूरी! जवानचं 'नाद खुळं' कलेक्शन

शाहरुख खानचा जवान पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली आहे.

Vaishali Patil

Jawan Box Office Collection Day 2: 'जवान'मधील शाहरुख खान आणि अॅटली यांची जादू सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. जवान या चित्रपटाला केवळ शाहरुखच्या चाहत्यांचाच नाही तर त्याच्या विरोधकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वच स्टार्स जवान आणि शाहरुखवर फिदा झाले आहे. या चित्रपटाने सोशल मीडियावर देखील वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे.

जवान सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. पहिल्या दिवशी जवान पाहिल्यानंतर बॉलिवूड आणि टॉलिवूड कलकारांनी देखील शाहरुखच्या कौतुकाचे पुल बांधले.

लोकांमध्ये जवान चित्रपटाची खुपच क्रेझ आहे. चित्रपटगृहात शाहरुखच्या एंट्रीवर फक्त टाळ्या आणि शिट्ट्या वाजत आहेत. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर जवान सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. 'जवान'ने पहिल्याच दिवशी चांगला व्यवसाय केला. आता जवानच्या दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन देखील समोर आले आहे.

पहिल्या दिवशी जबरदस्त ओपनिंग देणाऱ्या या चित्रपटाची कमाई दुसऱ्या दिवशी कमी झाली असली तरी या चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

SACNILC ने दिलेल्या अहवालानुसार, जवानाने दुसऱ्या दिवशी 53 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. जवानने पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई करत सुपरहिट ओपनिंग दिली. या कमाईसोबतच हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

त्यामुळे आता दोन्ही दिवासाचे कलेक्शन पाहता जवानने आता 127.50 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडला हे कलेक्शन नक्कीच वाढणार अशी अपेक्षा आहे.

जवान चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत आणि 5 वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसत आहे. त्याने उत्तम अभिनय केला आहे. शाहरुख खानच्या दमदार अ‍ॅक्शन सीक्वेन्ससोबतच नयनताराचा आणि विजय सेतुपतीची खलनायकाची भूमिकाही 'जवान' चित्रपटाला सुपरहिट करण्यास मदत करत आहे त्यासोबत सान्या मल्होत्रा ​​देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि संजय दत्तने चित्रपटात कॅमिओ केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

SCROLL FOR NEXT