jawan shah rukh khan record break advance booking in america crossed pathaan SAKAL
मनोरंजन

Jawan: शाहरुखच्या 'जवान'ची अमेरिकेत ऐतिहासीक कामगिरी, रिलिजपुर्वीच केले रेकॉर्ड

शाहरुखच्या जवानची जगभर किती हवा आहे, याचा अनुभव नुकताच आला

Devendra Jadhav

Shah Rukh Khan Jawan: शाहरुख खानचा जवान सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. जवान सिनेमाचा ट्रेलर अजुन रिलीज झाला नाही तोच सिनेमाची जगभर किती चर्चा आहे, याचा अनुभव नुकताच आहे.

शाहरुख खानच्या जवानने अमेरिकेत स्वतःचा डंका मिरवलाय. शाहरुख खानच्या जवानने आजवर कोणाला जमली नाही अशी ऐतिहासीक कामगिरी केलीय. काय घडलंय बघुया...

(jawan shah rukh khan record break advance booking in america)

शाहरुखच्या जवानचा अमेरिकेत ऐतिहासीक रेकॉर्ड

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच येणार आहे. आज सोमवार, २८ ऑगस्ट रोजी निर्माते 'जवान'चा ट्रेलर रिलीज करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात शाहरुख खान आतापर्यंतच्या सर्वात अनोख्या अवतारात दिसणार आहे.

करण जोहरने इंस्टाग्रामवर ट्रेलर पाहिला आणि त्याला 'शतकातुन एकदाच निर्माण होणारा ट्रेलर' असे कॅप्शन दिलंय. या सगळ्यात 'जवान'ने आगाऊ बुकिंग करून इतिहास रचला आहे. अमेरिकेत, चित्रपटाने पहिल्या दिवसासाठी $225K म्हणजेच 1.85 कोटी रुपयांची आगाऊ बुकिंग केली आहे.

शाहरुखच्या पठाणपेक्षा सरस जवान

अमेरिकेतील आगाऊ बुकिंगचे हे आकडे 'पठाण' पेक्षाही चांगले आहेत. शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाचे जगभरात 1050.05 कोटी रुपयांचे कलेक्शन होते. अशा स्थितीत 'जवान' हा आकडाही सहज पार करेल, असा अंदाज आहे.

भारतात या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग अद्याप सुरू झालेले नाही, मात्र अमेरिकेपासून भारतापर्यंत सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरसाठी असलेली लोकांची उत्सुकता पाहून चाहते जवान सुपरहिट करतील यात शंका नाही.

जवानचं नवीन गाणं

जवान सिनेमाचं नॉट रमय्या वस्तामैया या नवीन गाण्याच्या टीझरमध्ये शाहरुख खान जबरदस्त डान्स करताना दिसतो आहे. संपूर्ण काळ्या कपड्यांमध्ये किंग खान अधिकच हँडसम दिसतोय. टीझरमध्ये जे बोल ऐकायला मिळत आहेत त्यात शाहरुखच्या प्रसिद्ध छैया, छैया या गाण्याचा उल्लेखही आहे. या गाण्यानं नुकतेच २५ वर्षे पूर्ण केली. त्याचबरोबर 'जिंदा बंदा' आणि 'चलेया' ही गाणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत. यानंतर आता हे नवं गाण देखील प्रेक्षकांसाठी खास ठरेल. (Entertainment News in Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ८ प्रभागांची नावे बदलली

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT