Jaya And Amitabh Love Story Esakal
मनोरंजन

Jaya And Amitabh Love Story: 'या' कारणामुळे अभिताभ यांनी केलं जयांसोबत तडकाफडकी लग्न! नाहीतर आता...

Vaishali Patil

बॉलिवूडमधील असे अनेक जोडपे आहेत जे अनेक वर्षांपासून एकत्र राहत आहेत. त्याच्यातील केमेस्ट्री ही चाहत्यांना खुप आवडते. मग ती ऑन कॅमेरा असो किंवा खऱ्या आयूष्यात. अशाच कपलमध्ये बॉलिवूडचे शंहशाह अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या नावाचा सामावेश आहे.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला जवळपास 50 वर्षे झाली आहेत. दोघांनी अनेक उत्तम चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र, दोघांची प्रेमकहाणी त्याहूनही अधिक रंजक आहे. त्याच्या मागच कारणही तसचं आहे. आज जया बच्चन त्याचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहे.

जया बच्चन या त्यांच्या लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत राहिल्या. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या अफवांमुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठे वादळ आलं मात्र त्यांनी या वादळाची संयमाने सामना केला आणि आजही अभिताभ आणि जया हे एकत्र आणि आंनदी जीवन जगत आहे.

जया यांनी अमिताभ यांना पहिल्यांदा पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पाहिले होते. तिथे बिग बी देखील चित्रपट निर्माते के अब्बास आणि इतर काही कलाकारांच्यासोबत आले होते.

त्या काळात अमिताभ यांच नावं मोठं नव्हतं ते त्या काळात स्ट्रगल करत होते. मात्र त्यावेळी जया हा चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध चेहरा होता. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिलेले होते.

जया यांनी अमिताभ यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्यांना बिग बींचे व्यक्तिमत्त्व खूप आवडले. तर दुसरीकडे अभिताभ बच्चन यांनी एका मॅगझिनमध्ये जयाचा फोटो पाहिला आणि पाहताच ते त्यांच्या प्रेमात पडले. नंतर दोघांमध्ये चर्चा आणि भेटीगाठी सुरू झाल्या.

मात्र त्यावेळी अभिताभ बच्चन यांचे सलग 12 चित्रपट फ्लॉप झाले होते. यानंतर दोघेही 'जंजीर' चित्रपटात एकत्र दिसले.

हा चित्रपट हिट ठरला तर अभिताभ चित्रपटाच्या टिमला लंडनला घेवुन जातीय असं वचन त्यांनी पुर्ण टिमला दिलं होत. चित्रपट हिट झाला आणि आता त्यांना जया यांना लंडनला घेवुन जावे लागणार होते.

मात्र जेव्हा लंडनला जाण्याची ही गोष्ट अमिताभ बच्चन यांच्या वडीलांच्या कानावर पडली त्यावेळी हरिवंश राय यांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली.

त्यांना कोणीही कुठेही जाण्यास त्याचा आक्षेप नाही, मात्र यासाठी अमिताभला जयासोबत लग्न करावं लागेल आणि जया यांना बायको बनवून कुठेही घेऊन जा. असं सांगतिलं आणि त्यानंतर बिग बींनी जयाला याबाबत सांगितले आणि आई-वडिलांसोबत लग्नाबद्दल बोलले.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 जून 1973 रोजी साध्या सोहळ्यात दोघांनी लग्न केले. एकदा नव्याने तिची नात नव्या नंदा हिच्या पॉडकास्टमध्ये याबद्दल सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT