Jaya Bachchan viral video  esakal
मनोरंजन

Jaya Bachchan : 'बाई ते पापाराझी नाही उपराष्ट्रपती आहेत', राज्यसभेतही जया बच्चन शांत बसेना! नेटकऱ्यांनी काढला जाळ

बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन या नेहमीच त्यांच्या परखड स्वभावाबद्दल ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रेटी आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Jaya Bachchan bollywood actress arrogance : बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन या नेहमीच त्यांच्या परखड स्वभावाबद्दल ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रेटी आहेत. त्यांचा राग, संताप हा चाहत्यांना, नेटकऱ्यांना आणि खासकरुन पापाराझींना चांगलाच माहिती आहे. आता सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाल्या आहेत.

व्हायरल झालेला तो व्हिडिओ राज्यसभेतील आहे. यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनकर यांनी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यांनी उभं राहून सर्वांना शांत राहा. कोणताही गदारोळ न करता सभागृहाचे काम सुरु राहू द्या असे त्यांनी म्हटल्यानंतर काहींनी त्यानंतरही गोंधळ सुरुच ठेवला. कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

जया बच्चन यांनी आपले स्थान सोडत सभापतींसमोर येत त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत आपला राग व्यक्त केला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरुन अनेकांनी जया बच्चन यांना ट्रोल देखील केले आहे. एकानं प्रतिक्रिया दिली आहे की, तुम्ही ज्यांना बोलता आहात, ज्यांच्यासमोर हातवारे करता आहा ते काही तुमच्या घरासमोर उभे राहिलेले फोटोग्राफर्स, पापाराझी नाही. तेव्हा आपण काय करतो याचे भान ठेवा जयाजी...

सोशल मीडियावरुन त्या व्हिडिओचा अनेकांनी निषेध केला आहे. अतिशय परखड शब्दांत जया बच्चन यांना सुनावण्यात आले आहे. दरवेळी आपल्याला राग आल्यावर जयाजी काहीही बोलतात, कसेही वागतात. त्यांच्या यापूर्वीच्या व्हिडिओवरुन देखील ही गोष्ट लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्यांना देखील त्या वाट्टेल तसं बोलतात. त्यांना एवढा कसला राग येतो हे कळत नाही. असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

त्या व्हिडिओनंतर जया बच्चन मात्र चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये त्या फोटोग्राफर्सला न विचारता फोटो काढल्याप्रकरणी ओरडताना दिसल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why is SIR Important: भारतात एसआयआर महत्त्वाचे का आहे? निवडणूक आयोगाने चार मोठी कारणे सांगितली!

Mokhada News : सकाळ बातमीचा परिणाम! नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी शेतात.

Bhayandar accident : भाईंदर खाडी परिसरात 'चंदीगड एक्सप्रेस'मधून प्रवासी पडला; रेल्वे प्रशासनाकडून चौकशी होणार!

India SIR Schedule: बिहारनंतर देशातील १२ राज्यांमध्ये एसआयआर लागू, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, जाणून घ्या 'या' राज्यांची नावे

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT