Jeevan Gaurav Award esakal
मनोरंजन

Jeevan Gaurav Award : गायिका अनुराधा पौडवालांना 'जीवन गौरव', तर कवी नायगावकरांना 'समाज भूषण' पुरस्कार जाहीर

निवड समितीचे अध्यक्ष कथाकथनकार बाबासाहेब परीट यांनी या पुरस्काराची निवड केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

गुरुवारी (ता. १२) दुपारी चार वाजता विक्रमसिंह मैदानावर पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

जयसिंगपूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचच्या वतीने (Ratnappanna Kumbhar Vichar Manch) देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘जीवन गौरव’ पुरस्कार (Jeevan Gaurav Award) पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल (Singer Anuradha Paudwal) यांना जाहीर झाला आहे.

तसेच ज्येष्ठ पत्रकार, लेखक मधुकर भावे यांना ‘गौरव’ पुरस्कार, कवी अशोक नायगावकर यांना ‘समाज भूषण’, कथाकथनकार प्रा. आप्पासाहेब खोत यांना ‘साहित्यरत्न’, स्वामी समर्थ केंद्राचे आधारस्तंभ गोवर्धन दबडे यांचा ‘क्रांती’ पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.

गुरुवारी (ता. १२) दुपारी चार वाजता विक्रमसिंह मैदानावर पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती, मंचचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बंडा मिणियार यांनी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, ‘इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते ,आमदार विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुरेश कुराडे यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे.

निवड समितीचे अध्यक्ष कथाकथनकार बाबासाहेब परीट यांनी या पुरस्काराची निवड केली आहे. यावेळी मंचचे उपाध्यक्ष प्रताप नाईक, इम्तियाज खान, खजिनदार शंकर पाटील, अविनाश पाटील, बाबगोंडा पाटील, डॉ चिदानंद आवळेकर, श्रीमती स्वाती घाटगे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT