Jhimma 2 Teaser out now starring siddharth chandekar sonalee kulkarni sayali sanjeev directed by hemant dhome  SAKAL
मनोरंजन

Jhimma 2 Teaser: "इंदूच्या ७५ व्या वाढदिवसासाठी कोण कोण येणार?" झिम्मा 2 चा धम्माल टीझर पाहाच

झिम्मा 2 चा पहिला टीझर भेटीला आलाय

Devendra Jadhav

सिद्धार्थ चांदेकरची प्रमुख भुमिका असलेला झिम्मा 2 ची सर्वांना उत्सुकता आहे. झिम्मा 2 ची काहीच दिवसांपुर्वी घोषणा झाली. सिनेमाच्या घोषणेपासुनच झिम्मा 2 ची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

अशातच आज झिम्मा 2 चा टीझर भेटीला आलाय. या टीझरमध्ये एक खास गोष्ट दिसतेय. जाणुन घेऊया झिम्मा 2 च्या टीझरबद्दल.

(Jhimma 2 Teaser out now starring siddharth chandekar sonalee kulkarni)

झिम्मा 2 च्या टीझरमध्ये पाहायला मिळतं की सिद्धार्थ चांदेकर मोबाईलमध्ये मॅसेज टाईप करतो. त्यात तो लिहीतो की, "देवा लक्ष ठेवा! यांनो पुढच्या ट्रीपची तयारी करायला घ्या. कारण आहे इंदू डार्लिंगचा (सुहास जोशी) ७५ वा वाढदिवस. आणि तिला तो आपल्यासोबत सेलिब्रेट करायचाय. आणि तिच्याकडे एक सरप्राईज आहे. चला!"

मॅसेज टाईप केल्यावर सिद्धार्थ चांदेकर फोन बाजूला ठेवतो. आणि त्याच्या फोनमध्ये इतरांचे मॅसेज आलेले असतात. आता या ट्रिपला कोण कोण येणार? हे सिनेमात कळेलच.

कलर येलो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा 2 चित्रपटात तगड्या आणि लोकप्रिय कलाकारांची फौज पुन्हा एकत्र येत आहे.

ज्यात सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत यांचा समावेश आहे. आणि महत्वाचं म्हणजे या कलाकारांच्या टीम मध्ये काही नवीन सदस्यही सामील होणार आहेत अशी चर्चा आहे.

मराठीतील बहुप्रतिक्षित सिक्वेल झिम्मा2 ची आज तारीख जाहीर झाली आहे. एका पोस्टरद्वारे निर्माते जिओ स्टुडिओज आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्स, चलचित्र मंडळी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत 24 नोव्हेंबर 2023 रोजी चित्रपट रिलीज करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

आपल्या सोशल मिडिया अकाउंट वर पोस्ट करत निर्मात्यांनी असे म्हंटले आहे की, “पुढच्या ट्रीपची तारीख ठरली… आनंदाची गाडी सुटली! २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात”. त्यामुळे झिम्मा 2 पाहायला आणखी एक महिना वाट बघावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT