jhimma 2 teaser rinku rajguru sayali sanjeev directed by hemant dhome released diwali 2023  SAKAL
मनोरंजन

Jhimma 2 Teaser: "यावेळी बरीच व्हरायटी", झिम्मा २ चा धम्माल टीझर रिलिज; रिंकुने वेधलं सर्वांचं लक्ष!

झिम्मा 2 चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय

Devendra Jadhav

Jhimma 2 Teaser News: झिम्मा 2 सिनेमाची काही दिवसांपुर्वी घोषणा झाली. झिम्मा 2 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. झिम्मा 2 मध्ये रिंकु राजगुरु आणि शिवानी सुर्वे या दोघी सहभागी होणार याचाही खुलासा झाला होता.

अखेर झिम्मा 2 चा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. झिम्मा 2 च्या टीझरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं रियुनियन झालं असुन यंदा दुप्पट मजा येणार यात शंका नाही.

(jhimma 2 teaser rinku rajguru sayali sanjeev directed by hemant dhome)

झिम्मा 2 च्या टीझरमध्ये रिंकुने वेधलं सर्वांचं लक्ष

झिम्मा 2 च्या टीझरमध्ये पाहायला मिळतं की, इंदूचा (सुहास जोशी) ७५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळे एकत्र जमतात. पुन्हा एकदा दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज झाली आहे. सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा टिझर मधून मजेदारपणे झळकत आहे.

पुन्हा एकदा सर्व गँग परदेशी फिरायला जाते. यावेळी या गँगमध्ये दोन नवीन मेंबर सहभागी झाल्या आहेत. एक म्हणजे निर्मलाची सुन म्हणजेच रिंकू. आणि शिवानी सुर्वे.

रिंकुने तिच्या खास अंदाजात टिझरमध्ये सर्वांचं लक्ष वेधलंय. पहिल्यांदाच रिंकु हलक्याफुलक्या विनोदी भुमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळते. आता या सर्वजणींना सांभाळता सांभाळता सिद्धार्थ चांदेकरची कशी तारांबळ उडणार हे सिनेमात पाहायला मिळेल.

'झिम्मा २' मध्ये या सर्वजणींची मैत्री आणखी घट्ट झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे प्रेक्षकांसाठी असलेली ही मनोरंजनाची सहल अधिकच अविस्मरणीय ठरेल यात शंका नाही!

सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या गेल्या भागातील कलाकारांसोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी देखील या तगड्या स्टारकास्टमध्ये दाखल झाल्या आहेत.

‘झिम्मा' च्या पहिल्या भागातील सात मैत्रिणींना प्रेक्षकांनी आपलेसे केले आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची मोहर उमटवली.

आता या सर्व मैत्रिणी बऱ्याच काळानंतर एकत्र आल्यानंतर आता या सगळ्यांचे ‘रियुनियन’ किती हॅपनिंग असणार, हे अनुभवणे औत्सुक्याचे ठरणार आहे. झिम्मा 2 हा सिनेमा २४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT