Jiah Khan Case Verdict Sooraj Pancholi First Reaction After Being Acquitted In Jiah Khan Suicide Case Post Viral Esakal
मनोरंजन

Jiah Khan Case: जिया खान आत्महत्या प्रकरणात निर्दोष मुक्ततेनंतर सुरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया.. सत्याचा नेहमी...

Vaishali Patil

Jiah Khan Suicide Case: अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणाची आज सर्वत्र चर्चा सुरु होती. गेल्या 10 वर्षांपासून या निर्णयाची प्रतीक्षा होती. याआधी न्यायालयाचा निर्णय लवकरच येणार होता पण जिया खानची आई राबिया यांनी काही लेखी गोष्टी सादर करण्यासाठी थोडा वेळ मागितला होता. त्यामुळे न्यायालयाने दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आपल्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

मात्र आता सूरज पांचोलीला या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणात सीबीआयने सूरज पांचोलीची पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली आहे. सूरज आणि त्याच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा प्रसंग आहे.

जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या बाजूने निकाल लागल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर ‘सत्याचा नेहमीच विजय होतो’ असे लिहिले आहे. त्यातबरोबर त्याने देव महान आहे असंही हॅशटॅग टाकला आहे. त्याच्या या पोस्टची सध्या चर्चा सुरु आहे.

सूरज पांचोलीवर जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. जियाची आई राबिया खान यांनीही मुलीची हत्या केल्याचा आरोप केला होता. खुनाचे प्रकरणही सीबीआयने कोर्टात फेटाळून लावले.

न्यायमूर्ती एएस सय्यद यांचा हा निर्णय पुराव्याआभावी कोर्टाने हा निर्णय दिला आहे. आला आहे. सुरज पांचोलीने जिया खानला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा नाही, असे न्यायालयाच्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे जिया खानच्या आईची मात्र न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा भंग झाली असल्याचं दिसत आहे. जियाची आई राबिया सुरुवातीपासून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे सांगत आहे. सूरज पांचोलीच्या निर्दोष सुटकेवर जिया खानच्या आईने आपला लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितलं आणि या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. असं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT