Jitendra Joshi's 'Godavari' marathi movie to premiere on Jio cinema OTT from June 3 sakal
मनोरंजन

Godavari: राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'गोदावरी' आता OTT वर तेही मोफत! कधी, कुठे आणि कसा पाहाल?

मराठीतील मोठ्या चित्रपटाचा आता घरबसल्या आनंद घ्या..

नीलेश अडसूळ

Godavari marathi movie OTT : राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवलेला चित्रपट म्हणजे 'गोदावरी'. या चित्रपटाचे समीक्षकांनी ही कौतुक केले. नदीच्या प्रवाहासोबत माणसाच्या जीवनाचा प्रवास सांगणारा असा हा अत्यंत वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जोरदार कमाई केली. परंतु अनेकांनी हा चित्रपट पाहिला नसेल किंवा अनेकांना पुन्हा पाहायचा असेल. अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'गोदावरी' हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

(Jitendra Joshi's 'Godavari' marathi movie to premiere on Jio cinema OTT from June 3)

निखिल महाजन दिग्दर्शित आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 3 जून रोजी डिजिटल प्रीमियरद्वारे हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे हा चित्रपट आपल्यालं विनामूल्य पाहता येणार आहे.

जीतेंद्र जोशी सह अभिनेत्री नीना कुलकर्णी, विक्रम गोखले, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव आणि संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी राहणाऱ्या एका कुटुंबाभोवती फिरते.

भावना, आव्हाने आणि मानवी नातेसंबंधांच्या नाजूक पदरांचा वेध हा चित्रपट सुंदररित्या घेतो. नदीच्या रम्य पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटाची कथा निखिल महाजन व प्राजक्ता देशमुख यांची आहे.

२०२१ मध्ये व्हँकुव्हर चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. खिळवून ठेवणारी कथा आणि अप्रतिम अभिनयासाठी या चित्रपटाचे तेथे खूप कौतुक झाले. असा हा चित्रपट आता 3 जून पासून कधीही कुठेही पाहू शकता फक्त जियो सिनेमावर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT