John Abraham 
मनोरंजन

जॉन अब्राहमच्या संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल!

जाणून घ्या, एका चित्रपटासाठी तो किती मानधन घेतो?

स्वाती वेमूल

अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham) नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेता म्हणून जॉनने स्वत:ची ओळख निर्माण केली असून त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. जॉनने २००३ मध्ये 'जिस्म' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी त्याने मॉडेल म्हणून इंडस्ट्रीत आपला जम बसवला होता. बॉलिवूडमध्ये अनेक नवनव्या अभिनेत्यांची एण्ट्री होत असतानाच जॉनने मात्र आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. इतकंच नव्हे तर संपत्तीच्या बाबतीतही तो अनेक कलाकारांच्या पुढे आहे. (John Abraham's Net Worth)

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, जॉन तब्बल ३४ दशलक्ष युएस डॉलर्स म्हणजेच जवळपास २५१ कोटींचा मालक आहे. १७ डिसेंबर १९७२ रोजी केरळमध्ये जॉनचा जन्म झाला. ४९ वर्षीय जॉनची सर्वाधिक कमाई ही चित्रपटांमधूनच होते. एका चित्रपटासाठी तो जवळपास सहा ते सात कोटी रुपये मानधन घेतो.

अभिनयाशिवाय जॉन अनेक ब्रँड्सचा अॅम्बेसेडर असून त्यातून त्याची बरीच कमाई होते. ब्रँड एंडोर्समेंटसाठी तो जवळपास एक कोटी रुपये मानधन घेतो. इतकंच नव्हे तर त्याचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊससुद्धा आहे. त्याच्या प्रॉडक्शन हाऊसने 'विकी डोनर' आणि 'मद्रास कॅफे' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. जॉन फिटनेस फ्रीक म्हणून ओळखला जातो. त्याला स्पोर्ट्सची खूप आवड असून इंडियन सुपर लीगमधील नॉर्थईस्ट युनायटेड एफसी या फुटबॉल संघाचा तो मालक आहे.

बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक जॉन असून त्याचं वार्षिक उत्पन्न जवळपास १५.५ कोटी रुपये इतकं असून दरवर्षी हा आकडा वाढतोय. तो लवकरच 'अटॅक' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २८ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचा 'सत्यमेव जयते २' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याने तिहेरी भूमिका साकारल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT