Johnny Depp dating Camille Vasquez: साऱ्या जगानं हॉलीवूडच्या त्या प्रसिद्ध जोडप्याचा खटला लाईव्ह पाहिला होता. एकमेकांवर कोणत्याही क्षुल्लक कारणावरुन केलेले टोकाचे आरोप, शिवीगाळ, मारहाण यावरुन झालेले आरोप प्रत्यारोप यामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले होते. हा खटला होता पायरेटस ऑफ कॅरेबियनचा प्रख्यात अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पत्नी अंबर हर्ड यांचा. एखाद्या जोडप्याच्या आयुष्यात किती वेगवेगळे प्रश्न असू शकतात, ते कोणत्या कारणासाठी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेऊ शकतात हे या दोन्ही सेलिब्रेटींच्या खटल्याकडे पाहून सगळ्यांना माहिती झाले होते.
अखेर जॉनीनं एंबर हर्डपासून काडीमोड घेतलाच. त्यानं तिला मोठ्या प्रमाणात अब्रुनुकसानीची रक्कमही देण्यास भाग पाडले. आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ज्या कॅमिली वॅसक्युजनं जॉनीचा खटला लढवला होता ते एकमेकांना डेट करत असल्याचे दिसून आले आहे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंना दिलेल्या प्रतिक्रिया हा मात्र भलत्याच भन्नाट आहे.
खटल्या दरम्यान अनेकदा कॅमिली आणि जॉनीचे एकमेकांकडे पाहतानाचे, हसतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरुन काही मीम्स देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. आता ते एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. ज्या वकीलानं घटस्फोटाचा खटला लढला तिच्याच प्रेमात हा पडला. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जॉनला मिळताना दिसत आहेत. जॉली ही लंडनमधील एक प्रथितयश वकील असून ती तिच्या जोडीदारापासून वेगळी झाली आहे. त्यामुळे ती आणि जॉनी यांच्यात डेटिंग सुरु असल्याच्या बातम्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
काही दिवसांपूर्वी जॉन हा कॅमिली वॅसक्युजला डेट करत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्या वकीलानं या साऱ्या गोष्टींबाबत खुलासा केला आहे. तिनं हे सगळं खोटं असून कुणीतरी अफवा पसरवण्याचे काम करत असल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीमध्ये आपलं नाव ज्याच्याशी जोडलं जातंय त्याच्याशी आपला काही एक संबंध नसल्याचे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.