Jr NTR Birthday  
मनोरंजन

Jr NTR Birthday : 'बर्थ डे'ची बोकड पार्टी, चाहते तर्राट! पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर हा त्याच्या हटके स्टाईल आणि अभिनयासाठी ओळखला जातो. याशिवाय तो भारतीय चित्रपट विश्वातील सर्वाधिक प्रसिद्ध डान्सरही आहे.

युगंधर ताजणे

Jr NTR Birthday : दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर हा त्याच्या हटके स्टाईल आणि अभिनयासाठी ओळखला जातो. याशिवाय तो भारतीय चित्रपट विश्वातील सर्वाधिक प्रसिद्ध डान्सरही आहे. त्याचा डान्स काय अफलातून आहे हे आरआऱआऱमध्ये प्रेक्षकांनी पाहिले आणि अनुभवले आहे. एनटीआरच्या वाढदिवसादिवशी घडलेली एक बातमी आता व्हायरल झाली आहे.

केवळ भारतातच नाहीतर जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये ज्युनिअर एनटीआरचा चाहतावर्ग मोठा असल्याचे दिसून आले आहे. ऑस्करच्या सोहळ्यात सहभागी झालेल्या एनटीआर त्याच्या आकर्षक वेशभुषेमुळे जास्त चर्चेत आला होता. खास करुन त्याच्या कोटावर असणाऱ्या वाघाच्या चित्रामुळे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता एनटीआरच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांनी घातलेल्या गोंधळाची बातमी समोर आली आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

तीन दिवसांपूर्वी ज्युनिअर एनटीआरचा बर्थ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बॉलीवूड, टॉलीवूडमधील त्याच्या असंख्य चाहत्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या. त्याच्या ४० व्या वाढदिवसादिवशी दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये एनटीआऱचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यात एनटीआरच्या काही चाहत्यांनी मर्यादा ओलांडल्यानं पोलिसांना त्यांना अटक करावी लागली आहे.

कर्नाटकच्या पोलिसांनी एनटीआरच्या नऊ चाहत्यांना अटक केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एका वेबपोर्टलनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एनटीआरच्या बर्थ पार्टीच्या निमित्तानं काही चाहत्यांनी त्या दोन बोकडांना अमानुषपणे ठार केले. त्यानंतर त्याचे रक्त एनटीआरच्या फ्लेक्सवरही टाकले. त्यानंतर पोलिसांना ही गोष्ट कळताच त्यांनी त्या चाहत्यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT