Jr NTR in a still from RRR.  Google
मनोरंजन

RRR सिनेमाच्या शूटिंगचे 'ते' 65 दिवस Jr NTR साठी कठोर शिक्षेसारखेच...

एस.एस.राजामौली यांच्या 'RRR' सिनेमानं बॉक्सऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

प्रणाली मोरे

एस.एस.राजामौली(Rajamouli)यांच्या 'RRR' सिनेमानं बॉक्सऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. आज सगळीकडे याच सिनेमाची चर्चा आहे. गेली दोन ते तीन आठवडे ज्या 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files)नं बॉक्सऑफिसवर आपली घोडदौड सुरु ठेवली होती तिला रोकण्याचं काम 'RRR' नं केलं आहे. या सिनेमात ज्युनिअर एनटीआर,राम चरण,आलिया भट्ट,अजय देवगण अशी स्टारकास्ट आहेत. ज्युनिअर एनटीआरचा तर हा राजामौलीसोबतचा चौथा सिनेमा आहे. या सिनेमानं जगभरात तब्बल ५०० करोडचा बिझनेस बॉक्सऑफिसवर केला आहे. या सिनेमाच्या निमित्तानं बोलताना ज्युनिअर एनटीआरनं 'RRR' सिनेमातील भूमिकेविषयी खूप मेहनत घेतल्याचं सांगत काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.

ज्युनिअर एनटीआरनं 'RRR' सिनेमात कोमाराम भीम ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमा दोन भारतीय क्रांतीकारी,एक कोमाराम भीम आणि दुसरा अल्लुरी सितारामा राजू. यांचा हैद्राबादचे निझाम,ब्रिटिश राज यांच्याविरोधातला लढा दाखवण्यात आला आहे. या सिनेमाच्या निमित्तानं मुलाखत देताना ज्युनिअर एन टीआर म्हणाला,''एकाच व्यक्तिरेखेत मला जहाल आणि मवाळ असे दोन्ही रंग दाखवायचे होते. राजामौली नेहमीच मला आव्हानात्मक भूमिका देत आलेयत. मी कोणत्याही भूमिकेसाठी विशिष्ट तयारी करत नाही की कोणतं विशिष्ट तंत्र वापरत नाही. मला फक्त एवढं कळतं की कोणत्याही अभिनेत्यानं आपल्या दिग्दर्शकाला जे हवं तसं करावं. माझ्या स्वभावात मूळतः साधेपणा आहे,जो मला 'RRR' मधील माझी व्यक्तिरेखा साकारताना कामी आला''.

''जे काही मी माझ्या करिअरमध्ये शिकलोय ते सगळं मी या भूमिकेसाठी कामी आणलं. राजामौलीनं माझ्याकडून परफेक्ट काम काढून घेण्यासाठी एखाद्या प्राण्याप्रमाणे माझा पाठलाग केला. जर त्याने तसं केलं नसतं तर कदाचित 'RRR' सिनेमा असा बनूच शकला नसता. बल्गेरियाच्या जंगलात माझा सिनेमातील एक सीक्वेन्स तब्बल १२ दिवस शूट करण्यात आलाय. तर इंटरव्हलआधीचा एक सीन तब्बल ६५ रात्री शूट केला आहे. ते खूप थकवणारं होतं पण आता त्याचं मोल कळत आहे. बॉलीवूडमध्ये येण्याचं मी स्वप्न पाहत नाही. हो पण समोरुन विचारलं गेलं तर नक्की करेन'' असं ज्युनिअर एन.टी.आर म्हणाला. राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांचं काम आपल्याला आवडतं असंही त्यानं आवर्जुन सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT