Jui Gadkari
Jui Gadkari Google
मनोरंजन

'वो स्त्री है! कुछ भी कर सकती है!!' अभिनेत्री जुई गडकरीची पोस्ट चर्चेत

प्रणाली मोरे

'पुढचं पाऊल' या मालिकेतनं घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी(Jui Gadkari) अभिनयातलं इतकं चांगलं करिअर सोडून अचानक गायब कशी झाली बरं असा प्रश्न सर्वसामान्य चाहत्यांना कदाचित पडला असेल. आज कदाचित जुईचा फोटो अन् तिनं केलेली ती पोस्ट पाहून पुन्हा ही तिच का मुलगी पुढचं पाऊल मधील मुख्य पात्र रंगवणारी अभिनेत्री? असा प्रश्न पडून टकन जुई आठवेलही पण तिची पोस्ट वाचून तिच्या अभिनयाला आपण कदाचित जितकी दाद दिली नसेल त्याहून अधिक तिच्या संघर्षाला सलाम करावासा वाटेल आपल्या सगळ्यांना. खरं तर जुईला आपण 'मराठी बिग बॉस सिझन १'(Marathi Big Boss 1) मध्ये पाहिलं असेल.त्यावेळी तिनं तिथे तिला होणाऱ्या शारिरीक त्रासाविषयी सांगितलं होतं. पण तेव्हा ती कदाचित लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी केलेली ड्रामेबाजी आहे असं वाटलं असेल सगळ्यांना. पण जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तिनं केलेली पोस्ट मनाला चटका लावून जातेच पण त्याहून अधिक जुईची आजाराशी सुरू असलेली झुंज आपल्या मनाला सकारात्मकतेच्या जादूची अनुभूती नक्कीच देऊन जाईल.

'सरस्वती','पुढचं पाऊल','बिग बॉस' मधनं जुई गडकरी घराघरातील प्रेक्षकांच्या ओळखीची झाली. सध्या ती फारशी अभिनयक्षेत्रात सक्रिय नसली तरी सोशल मीडियावरील तिच्या पोस्टच्या माध्यमातून मात्र ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. सध्या ती चर्चेत आहे ते तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे. जुई गडकरीनं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं तिच्या मागे लागलेल्या गंभीर आजाराचा खुलासा केला आहे. पण याविषयी खुलासा करताना तिनं त्या आजाराशी केलेले दोन हात आणि त्यासाठी करावा लागलेला संघर्ष विस्तारितपणे मांडला आहे.

जुईनं तिच्या पोस्ट मध्ये २०१३ पासून आपल्या आयुष्यात अचानक कसं एकेक आजारांनी दस्तक द्यायला सुरुवात केली याविषयी लिहिलं आहे. ती म्हणालीय, ''अचानक सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमातनं परतताना पाय सुजणं,त्यानंतर पाठीच दुखणं वाढल्यानं मी डॉक्टरकडे गेले. 'पुढचं पाऊल' मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत असल्यामुळे सुट्टी मिळेल का याची शंका होती. पण एक दिवस सुट्टी मिळाली त्यात डॉक्टरकडे चेकअप साठी गेले. सगळ्या तपासण्या,एक्स-रे काढल्यानंतर काहीतरी गंभीर आहे असं मला वाटलं जेव्हा डॉक्टरने MRI आणि काही रक्ताच्या चाचण्या करायला सांगितल्या. काहीवेळानंतर रिपोर्ट्स पाहून डॉक्टरने जेव्हा सांगितलं मणक्या खालची मऊ गादी फाटून खालच्या मेंदूला जाणाऱ्या नसा दबल्या आहेत,मणका सरळ झालाय तेव्हा मात्र अंगातलं अवसान गळालं''.

शुटिंग कसं करणार याचं टेन्शन होतंच. पण वयाच्या २३-२४ वर्षात असा आजार झाला तर पुढे सगळं कसं होणार हा प्रश्न होताच. अचानक वजन वाढण्याचं संकट डोक्यावर घोंघावू लागलं,केस,भुवया,पापण्या गळू लागल्या. थायरॉईडनं डोकं सुळकी मारुन वर काढलं होतं मध्येच. जीम,ट्रेकिंग,डान्स सगळं जे आवडीचं होतं ते टोटल बंद. डिप्रेशनमध्ये गेले होते,४ वर्ष गेली,सुधारणा फक्त एवढीच की दुखणं थोडं कमी झालं होतं. शूटिंग कसंबसं करत होते तेही एका सीननंतर थोडा आराम करायची परवानगी मिळाल्याने. पण पुढे 'पुढचं पाऊल' मालिका सोडावी लागली. खूप कठीण होतं माझ्यासाठी ते. पुढे तर वेगळाच गायनॅक प्रॉब्लेम समोर आला. ज्यात तपासण्या केल्यावर कळालं की मला Prolactin Tumour आहे pitutory मध्ये. मुलं होताना अडचण येऊ शकते पण डॉक्टरने आधार दिला विज्ञान खूप पुढे गेलंय,घाबरु नकोस. ही सगळी अचानक आलेली वादळं माझा आत्मविश्वास डळमळू पाहत होती. पण माझ्या गुरुंच्या विचारांनी मला बळ दिलं,घरच्यांनी आधार अन् माझ्या मनातल्या आत्मविश्वासानं या गंभीर आजारांनी केलेला एकामागून एक वार सहन करण्याची शक्ती दिली''.

''जे करण्यापासून मला डॉक्टरनं नकार दिला होता ते आता मी हळूहळू करु लागलेय. जिथे व्यायाम बंद सांगितला होता तिथे मी आज १०८ सूर्यनमस्कार घालते. फक्त विश्वास हवा आणि सोबत कधीही साथ न सोडणारे सहप्रवासी या खडतर प्रवासात हवेत. पुन्हा त्या सगळ्यांबद्दल सविस्तर लिहेन. आज मी फक्त माझ्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला एक Strong सकारात्मक उर्जा मिळावी यासाठी ही पोस्ट लिहिली आहे''. आम्ही ही तिच्या संघर्ष कहाणीची पोस्ट इथं थोडक्यात भाषांतरीत करून लिहिली आहे. पण जुई गडकरीची ओरिजनल पोस्ट बातमीत जोडलेली आहे. ती पूर्ण वाचली तर नक्कीच एक नवी उभारी प्रत्येकाला मिळू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BAN vs IND women T20 : टीम इंडिया शेवटही करणार गोड.? आज बांगलादेशविरुद्ध अखेरचा सामना

Salman Khan Firing Case: फक्त सलमान खानच नाही, तर इतर दोन प्रसिद्ध अभिनेतेही होते बिश्नोई गँगच्या रडारवर

CM Shinde : अभिनेत्याचा 'कार'नामा! सी-लिंकवर टोल वाचावा म्हणून मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातून नेली कार; पोलिसांनी शिकवली अद्दल

VIDEO: दुबईत भर कॉन्सर्टमध्ये चक्क स्टेजवर नखं कापली; अरिजित सिंगचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "भावा ही कामं घरी कर!"

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT