Jr NTR Fan Shyam Dies
Jr NTR Fan Shyam Dies esakal
मनोरंजन

ShyamNTR : ज्युनियर एनटीआरच्या चाहत्याचा संशयास्पद मृत्यू! सोशल मिडियावर वातावरण तापलं..नेमकं प्रकरण काय?

Vaishali Patil

Jr NTR Fan Shyam Dies: तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआर उर्फ नंदामुरी तारका रामाराव ज्युनियर हा नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या एका कट्टर चाहत्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

त्याचे नाव श्याम असून तो ज्युनियर एनटीआरचा खुप मोठा चाहता होता. श्यामचा असा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने सर्वांनाच त्याची चिंता असून सर्व चाहते त्याला न्याय देण्यात यावा याची मागणी करत आहे.

अलीकडे, जेव्हा एनटीआर विश्वक सेन स्टारर धमकी या चित्रपटाच्या प्री-रिलीझ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाला होता, तेव्हा श्याम स्टेजवर आला आणि एनटीआरसोबत त्याने फोटो काढण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बॉडी गार्ड्सने त्याला बाजूला ढकलले तेव्हा एनटीआरने त्यांना थांबवत श्यामसोबत फोटो काढला. श्यामचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर खुप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

आता श्यामचा असा अचानक मृत्यू झाल्याने सोशल मीडियावर त्याला न्याय देण्यात यावा याची मागणी होत आहे.ट्विटर वर #WeWantJusticeForShyamNTR हे ट्रेंड करत आहे. वायएस जगन यांच्या सरकारकडे श्यामच्या मृत्यूचा त्वरित तपास आणि न्याय देण्याची मागणी केली आहे.

(Jr NTR Fan Shyam died in suspicious manner in Andhra Pradesh: Outrage in Social media)

एनटीआर फॅन श्याम पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कोप्पीगुंटा गावचा होता. तो गोदावरी जिल्ह्यातील महाविद्यालयात शिकत होता. चिंतलूर या गावी त्याचा मृत्यू झाला. चिंतलूर गावातील ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून आंध्र प्रदेशातील एनटीआर फॅन श्यामच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

श्यामचा मृत्यू गळफास घेऊन झाला यावर अनेकांना शंका आहे तर श्यामचा मृत्यू हा खून की आत्महत्या असा सवालही उपस्थीत झाला आहे. सोशल मीडियावर शेकडो लोक श्यामच्या मृत्यूमागची वस्तुस्थिती समोर आणून आरोपीला शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT