kangana Ranaut
kangana Ranaut 
मनोरंजन

दीपिकाचा 'गहराईया' म्हणजे कचरा, कंगनाची जहरी टीका

युगंधर ताजणे

Kangana Ranaut: दीपिका (Deepika Padukone) आणि कंगना (Kangana Ranaut) दोन्ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध (Bollywood Actress) अभिनेत्री आहेत. त्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. कंगना ही तिच्या बेताल वक्तव्यासाठी ओळखली जाते. दीपिका ही तिच्या परखड भूमिकेसाठी ओळखली जाते. सध्या दीपिकाच्या गहराईची चर्चा आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी लक्ष्य केलं आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नेटकऱ्यांमध्ये त्याची चर्चाही आहे. त्यामध्ये दीपिकानं दिलेले बोल्ड सीन हे कमालीचे वादात सापडले आहेत. दुसरीकडे कंगनानं आपल्या रियॅलिटी शो च्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. एका मुलाखतीमध्ये कंगनाला दीपिकावरुन प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. Deepika New Movie Gheraiyaan

दीपिका, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा गहराईया प्रदर्शित झाला आहे. थिएटर आणि ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. कंगनाला एका मुलाखीतमध्ये दीपिकाच्या नव्या चित्रपटावरुन प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिनं सांगितलं की, मला यावरुन प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. त्याचे कारण म्हणजे दीपिकाच्या चित्रपटाचे प्रमोशन मी का करु, आणि त्यात काय विचार मांडला आहे हे त्याच्या ट्रेलरवरुन दिसून आले आहे. बोल्ड सीन देणे, बोल्ड काम याशिवाय त्यात काय आहे. मला तर हे सगळं कचऱ्यासारखे वाटते. अशाप्रकारची प्रतिक्रिया कंगनानं दिली आहे.

कंगनानं दीपिकाच्या त्या चित्रपटाची तुलना पॉर्नोग्राफीशी केली आहे. कंगनानं इंस्टावरुन एक पोस्ट शेयर केली आहे. यावेळी तिनं मनोज कुमार यांच्या चित्रपटातील गाण्याचा दाखला दिला आहे. माझ्या दृष्टीनं रोमान्स या शब्दाची व्याख्या वेगळी आहे. शहरी चित्रपटांच्या नावानं कुठल्याही प्रकारचा कचरा प्रेक्षकांच्या माथी मारु नका. अशा प्रकारची प्रतिक्रिया कंगनानं दिली आहे. त्या चित्रपटाचे नाव आणि त्यात आशयात्मक असं काहीच नाही असेही कंगनानं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT