Shaktimaan Movie: 90 च्या दशकातला गंगाधर पुन्हा गरगरणार...

शक्तिमान (Shaktiman Movie) मालिकेची लोकप्रियता नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.
Shaktiman Movie
Shaktiman Movie

Entertainment News: भारतीय टेलिव्हिजनवर (Indian Televison) ज्या मालिकेनं गेल्या कित्येक वर्षांपासून अधिराज्य केलं, लहानांपासून मोठ्यांनाही प्रभावित केलं त्या मुकेश खन्ना दिग्दर्शित आणि अभिनित शक्तिमान (Shaktiman Movie) मालिकेची लोकप्रियता नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आता शक्तिमान या मालिकेवर चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. जगप्रसिद्ध निर्माते सोनीनं या मालिकेवर आधारित चित्रपट निर्मिती करणार असल्याची माहिती मिळाली आहे. आयकॉनिक सुपरहिरो शक्तिमान या चित्रपटाचा टीझर (Bollywood Movies) आता प्रदर्शित झाला आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे.

90 च्या दशकांत सुपरहिट टीव्ही मालिका शक्तिमानची लोकप्रियता मोठी होती. आता त्यावर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सोनी पिक्चर्सनं त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. त्याच्या टीझरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर जो टीझर व्हायरल झाला आहे त्यामध्ये मुकेश खन्ना यांची एक झलक चाहत्यांना दिसून येत आहे. 90 च्या दशकांमध्ये ही भूमिका मुकेश खन्ना यांनी केली होती. त्यांच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले. त्याला मनपूर्वक दाद दिली. सोनीनं त्यांच्या इंस्टा अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये भलेही शक्तिमानचा चेहरा दिसत नसला तरी, गंगाधरचा चष्मा मात्र दिसत आहे.

यासगळ्यात शक्तिमानची भूमिका कोण करणार याबाबत कोणताही खुलासा केला नसला तरी, ती भूमिका मुकेश खन्नाच करणार याविषयी चाहत्यांच्या मनात कोणतीही शंका नाही. अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. हा व्हिडिओ शेयर करताना सोनी पिक्चर्सनं लिहिलं आहे की, जगभरातल्या इतर अनेक सुपरहिरोंचा शोध घेतल्यानंतर आता भारतातल्या सुपरहिरोंचा नंबर आहे. तो सुपरहिरो चाहत्यांना आवडेल, प्रभावित करेल. असा आशावाद निर्मात्या कंपनीनं व्यक्त केला आहे. शक्तिमानचा पहिला एपिसोड हा 13 सप्टेंबर 1997 रोजी प्रदर्शित झाला होता. तो 2005 पर्यत सुरु होता.

Shaktiman Movie
Viral Video : महिलांची अंधश्रद्धा; चारचौघात खाताहेत चाबकाचे फटके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com