Kuch Kuch Hota Hai Esakal
मनोरंजन

Kuch Kuch Hota Hai विषयी 24 वर्षांनी काजोलचा मोठा खुलासा.. सिनेमातील 'न' पटलेली गोष्ट सांगत सगळ्यांनाच केलं हैराण

2019 मध्ये करण जोहरने देखील आपल्या सिनेमातील काही चुका समोर आणल्या होत्या पण आता काजोलनं केलेला खुलासा हा सिनेमातील चूक दाखवणारा असला तरी मजेदार आहे.

प्रणाली मोरे

Kuch Kuch Hota Hai: १९९८ मध्ये करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' सिनेमानं प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला होता. या सिनेमातील राहुल,अंजली या व्यक्तीरेखांनी प्रेम म्हणजेच मैत्री याचा धडा दिला. सिनेमात शाहरुख खान आणि काजोलच्या मुख्य व्यक्तिरेखा होत्या. तर सलमान खान आणि राणी मुखर्जी यांच्या सहाय्यक कलाकारांच्या भूमिका होत्या.

भारतीय सिनेमातील या सगळ्यात मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या क्लायमॅक्स मध्ये आपण सर्वांनी हेच पाहिलं की राहुल आणि अंजली मैत्रीच्या पुढे एक पाऊल टाकत एकमेकांच्या प्रेमाचा स्विकार करतात. यादरम्यान अमन ही व्यक्तिरेखा येते ,ज्याला अंजली सोबत लग्न करायचं असतं. पण राहुलसाठी अंजलीचं प्रेम पाहून अमन आपल्या प्रेमाचा त्याग करतो.

सिनेमाच्या रिलीजनंतर २४ वर्षानंतर आता काजोलनं एक मजेदार खुलासा केला आहे. अभिनेत्रीनं म्हटलं आहे की जर ती अंजलीच्या जागी असती तर क्लायमॅक्समध्ये तिनं राहुलसोबत नाही तर अमन सोबत जाणं पसंत केलं असतं.

काजोलनं एका मुलाखतीत आपल्या या ब्लॉकबस्टर सिनेमाविषयी बातचीत केली आहे. काजोलला जेव्हा विचारलं गेलं की, 'अंजली ही व्यक्तिरेखा तिच्या नजरेतून जर दाखवली गेली असती तर शेवटच्या क्षणी तिनं अमन की राहुलला निवडलं असतं?'

यावर काजोल म्हणाली, ''माझ्या नजरेतनं अंजली ही व्यक्तिरेखा पाहिली तर तिनं कधी साडी नेसली नसती. ती नेहमीच कॉलेज लाइफ सारखं ट्रॅक पॅंट्स घालून राहिली असती आणि सुंदर दिसली असती. महागडे शूज घातले असते''. (Kajol Speaks About Kuch Kuch Hota Hai ,reveal few things, fans shocked)

काजोल पुढे म्हणाली,''स्क्रिप्ट जर माझ्या हिशोबानं लिहिली गेली असती तर मी सलमान खान म्हणजे अमनचा स्विकार शेवटी केला असता ना की राहुलचा. पण सिनेमा जर तुम्ही पाहिलात तर अंजलीकडे राहुलसोबत जाण्याशिवाय दुसरा मार्गच ठेवला नव्हता. त्यामुळे तेच घडले,जे होऊ शकत होतं''.

'कुछ कुछ होता है' सिनेमात सुरुवातीच्या भागात आणि मध्यांतरानंतरही प्रेमाचा त्रिकोण दाखवला गेला आहे. पहिल्या भागात अंजली,राहुल आणि टिना यांच्यात लव्ह ट्रॅंगल दिसतो तर दुसऱ्या भागात अंजली राहुल आणि अमन यांच्यात लव्ह ट्रॅंगल पहायला मिळतो.

पहिल्या भागात राहुल आणि अंजलीची जीवापाड जपलेली मैत्री आणि टिना-राहुलमधलं प्रेम दाखवण्यात आलं आहे. राहुल टिनाशी लग्न करतो आणि त्याच्यावर एकतर्फी प्रेम करणारी अंजली तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेते.

अंजलीच्या आयुष्यात अमन येतो.म्हणजेच सलमान खानची एन्ट्री होते. पण नंतर कथेत ट्वीस्ट येतो ज्यामध्ये टीनाआणि राहुलची मुलगी पुन्हा अंजलीची भेट करवून देते. कारण तिच्या मृत आईनं म्हणजे टिनानं तिच्यासाठी लिहिलेल्या पत्रात अंजली आणि राहुलच्या मैत्रीविषयी,प्रेमाविषयी तिला सांगितलेलं असतं.अखेर खूप सारं भावनाट्य घडल्यानंतर राहुल आणि अंजली एकत्र येतात अन् लग्न करतात.

'कुछ कुछ होता है' मध्ये आपण काजोलची दोन रुपं पाहिली. कॉलेज लाईफमध्ये छोट्या केसांमध्ये टॉम बॉय मुलगी दिसतेय काजोल..जिचं तिचा मित्र राहुलवर प्रेम आहे. पण ८ वर्षांनी टॉम बॉयचा लूक बदलून एकदम साडीत,लांब केसांत मोठ्या ट्रान्सफॉर्मेशन सोबत ती पडद्यावर दिसते.

हेही वाचा: Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

२०१९ साली करण जोहरनं आपल्या 'कुछ कुछ होता है' सिनेमाला 'पॉलिटिकली इनकरेक्ट' म्हटलं होतं. इंडियन एक्सप्रेसशी बातचीत करताना करण म्हणाला होता,''मला शबाना आझमी यांचा फोन आला होता. त्या खूप रागात होत्या. त्या म्हणाल्या, तू हे काय दाखवलं आहेस? त्या मुलीचे केस छोटे आहेत म्हणून ती सुंदर नाही आणि लांब केस,साडी नेसली म्हणजे ती सुंदर आहे. तुला नक्की काय म्हणायचंय?''

करण म्हणाला की, ''शबाना आझमींचं ऐकल्यानंतर मला माझी चुक कळाली आणि मी माफी मागितली होती''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT