Kajol takes a sly dig at Bollywood Instagram
मनोरंजन

'२४ इंचाची कंबर अन् ३६ इंचाची छाती', काजोलचा बॉलीवूडला चिमटा

नुकत्याच एका मुलाखतीत काजोलनं ओटीटी प्लॅटफॉर्मची प्रशंसा करताना बॉलीवूडवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

प्रणाली मोरे

बॉलीवूडमध्ये(bollywood) आपल्या नैसर्गिक अभिनयानं यशस्वी अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या काजोलनं(Kajol) आज अनेक वर्षांनी बॉलीवूडच्या आतल्या गोटातील गोष्टींचा खुलासा करताना मोठं वक्तव्य केलं आहे,ज्याची चांगलीच चर्चा देखील रंगली आहे. काजोलनं खूप चांगल्या भूमिका आपल्या कारकिर्दीत केल्या आहेत. अजय देवगणशी लग्न झाल्यानंतर काम तिनं सुरु ठेवलं असलं तरी ती आता निवडक सिनेमे करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिनं नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केलं आहे. यानिमित्तानं एका मुलाखतीत चक्क तिनं अभिनेत्रींच्या फिगरला घेऊन बॉलीवूडची जी गणितं ठरली आहेत त्यावरच थेट बोट ठेवलं आहे. गमतीत का होईना पण तिनं बॉलीवूडला चांगलाच चिमटा काढला आहे.(Kajol takes a sly dig at Bollywood)

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणाली आहे की,''आजकाल सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पूर्वीपेक्षा अधिक वेगानं आणि मोठ्या प्रमाणात पोहोचतो. कारण पूर्वी फक्त सिनेमागृह हे एकच माध्यम त्यासाठी होतं. आणि लोकांना तिथे वेळ काढून जावं लागायचं. पण ओटीटीनं पूर्ण बाजूच पलटली. हे प्लॅटफॉर्म गेम चेन्जर ठरत आहे. खूप चांगल्या-दर्जेदार कलाकारांना काम मिळण्यासाठी आणि आपलं काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता वाट पहावी लागत नाही. सगळ्यांना काम मिळतंय आणि ते पटकन रिलीज होऊन त्याचं चीजही होताना दिसत आहे''.

याच मुलाखतीत काजोल पुढे म्हणाली,''आता असे अनेक कलाकार आहेत जे खरंच खूप उत्तम अभिनय करतात,त्याला ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे चांगला स्टेज मिळतोय,त्यांना आपल्यातलं टॅलेंट लोकांना आपल्या पद्दतीनं कुठल्याही नियमांत स्वतःला बांधून न घेता दाखवता येत आहे. अगदी बॉलीवूडच्या टिपिकल २४ इंचेस कंबर आणि ३६ इंचेस छातीच्या कुठल्याही मापदंडात न बसता''. असं बोलून काजोलनं एकप्रकारे बॉलीवूडच्या या बोगस नियमांवर ताशेरेच ओढले आहे.

काजोलच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'गुप्त' सिनेमानं नुकतीच २५ वर्ष पूर्ण केली. या सिनेमात पहिल्यांदाच तिनं खलनायिका साकारली होती. मनिषा कोईराला,बॉबी देओल यांनी देखील काजोलसोबत या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमाला २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत नुकताच एक सिल्व्हर ज्युबली सोहळा आयोजित केला होता. दिग्दर्शक राजीव राज,काजोल,बॉबी देओल यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

काजोल लवकरच रेवतीच्या 'सलाम वेंकी' सिनेमात दिसणार आहे. याआधी या सिनेमाचं टायटल 'द लास्ट हुर्रे'असं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT