Kajol's Invite To Oscar Academy Made Ajay Devgn "Incredibly Proud." See His Post Instagram
मनोरंजन

ऑस्कर समितीवर काजोलची निवड,पती अजय देवगणच्या पोस्टनं वेधलं लक्ष

काजोल आधी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना ऑस्कर समितीत सामिल होण्याचं निमंत्रण मिळालं आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री काजोल(Kajol),आणि दाक्षिणात्य अभिनेता सूर्या,दिग्दर्शक सुष्मित घोष,रिंटू थॉमस,फिल्ममेकर रीमा कागती यांच्यासोबत तब्बल ३९७ नवीन सदस्यांना अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अॅन्ड सायन्स म्हणजेच ऑस्कर अकादमीमध्ये(Oscar Acadamy) सामिल होण्याचं निमंत्रण गेलं आहे. अकादमीच्या वेबसाइटवर मंगळवारी रात्री उशिरा या सदस्यांच्या यादीला शेअर करण्यात आलं. या यादीत अशा लोकांची नावं आहेत ज्यांनी थिएटर आणि सिनेमा अशा दोन्हीमध्ये आपलं योगदान दिलं आहे.(Kajol's Invite To Oscar Academy Made Ajay Devgn "Incredibly Proud).

अकादमीनं आपल्या जाहिर केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे,''२०२२ मध्ये ४४ टक्के महिला आहेत आणि ३७ टक्के असे लोकं आहेत ज्यांना प्रतिनिधित्व करायची संधी कमी मिळाली आहे आणि ५० टक्के लोक हे अमेरिकेच्या बाहेरील ५३ विविध देशांमधून आहेत''. या यादीत बॉलीवूडची गुणी अभिनेत्री काजोल आणि तामिळ स्टार सूर्याला देखील निमंत्रित केलं गेलं आहे. डॉक्युमेंट्री विभागात सुष्मिता घोष आणि रिंटु थॉमस यांना आणि लेखन विभागात 'तलाश','गली बॉय','गोल्ड' सारख्या सिनेमांचे लिखाण केलेल्या रीमा कागतीला निमंत्रित केलं गेलं आहे.

Ajay Devgan Post for wife Kajol

या यादीत काजोलचं नाव सामिल झालं असल्यामुळे तिचा पती आणि अभिनेता अजय देवगणनं(AJay Devgan) आनंद व्यक्त केला आहे. अजय देवगणने सोशल मीडियावर लिहिलं आहे की,''ऑस्कर समितीवर निवड झाल्याबद्दल काजोलचं मनापासून अभिनंदन. मी खूप खूश आहे आणि मला आता खूप अभिमान देखील वाटत आहे. ऑस्कर समितीवर निवड झालेल्या सगळ्यांचे कौतूक''.

माहितीसाठी सांगतो की ,एआर रहमान,अमिताभ बच्चन,शाहरुख खान,विद्या बालन,आमिर खान,सलमान खान,अली फजल,माधुरी दिक्षित,अनिल कपूर,तब्बू,सौमित्र चटर्जी,नसिरुद्दीन शहा,आदित्य चौप्रा,गुनीत मोंगा,एकता कपूर,शोभा कपूर या सेलिब्रिटींची याआधी ऑस्कर समितीवर निवड झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT