Kalki Koechlin names her baby girl Sappho shares a post on Instagram 
मनोरंजन

कल्कीने पाऊलखुणांनी केलं छोट्या मुलीचं स्वागत, ठेवलं 'हे' अनोखं नाव !

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. रोमान्स, लग्न, अफेअर आणि डेटींग हे विषय बी-टाउनमध्ये नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडची अभिनेत्री कल्की कोचलिन गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. कल्कीने ती प्रेग्नंट असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आणि इंटरनेटवर त्याचीच चर्चा पाहायला मिळाली. कल्कीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यासोबत एका खास पद्धतीने तिने बाळाचं वेलकम केलं आहे. जाणून घ्या कल्कीने तिच्या मुलीचं काय नाव ठेवलं आहे. 

कल्की लग्नाआधीच ती प्रेग्नंट असल्याने नेटकऱ्यांनी तिला अनेक उलट-सुलट प्रश्नही केले. तिचं बेबी बंपसोबतचं फोटोशुट इंटरनेटवर चांगलच व्हायरल झालं आणि अनेकांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला. कल्की नुकतीच आई झाली आहे आणि शुक्रवारी (ता.7) संध्याकाळी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कल्कीने ही गोड बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली. त्यामुळे छोट्या परीचं नेमकं नाव काय ठेवणार आहे याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. कल्कीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. एक खास फोटोही तिने शेअर केला आहे. हा फोटो आहे, बाळाच्या पायांचे ठसे त्यामध्ये दिसत आहेत. 

कल्कीने मुलीचं 'हे' ठेवलं नाव !
कल्कीने तिच्या बाळाचं नाव फार विचार करुन ठेवलं आहे असे दिसते. तिच्या गोंडस मुलीचं नाव आहे 'साफो' (Sappho).  चाहत्यांसोबत हे नाव शेअर केल्यानंतर त्याचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये वाढली. 'साफो' हा ग्रीक शब्द आहे. साफो हे एका कवयित्रीचं नाव असून तिचा प्रचंड नावलौकिक होता. त्यामुळेच कल्कीने आपल्या बाळाचं नावदेखील हेच ठेवलं. 

कल्कीने पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "कृपया साफोचं स्वागत करा. नऊ महिने ती एखाद्या मोमोप्रमाणे माझ्या गर्भाशयात शांत झोपली होती. त्यामुळे आता तिला या नव्या जगात थोडीशी जागा देऊया. तिला अनेक आशीर्वाद आणि तिचं स्वागत केल्यामुळे मनापासून आभार. ज्या महिला प्रसुतीवेदनांना सामोऱ्या जातात, त्या महिलांचा कायम आदर करा. त्यांचा हक्क आपण त्यांना दिला पाहिजे''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परवडणारी घरे, मोफत वीज, स्वस्त बस भाडे अन् महिलांसाठी मासिक भत्ता... ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात मोठ्या सवलतींची घोषणा

Akola Police : अकोला पोलिसांची ‘स्मार्ट पोलिसिंग’कडे पाऊल; AI-आधारित WhatsApp चॅटबॉट ‘अकोला कॉप कनेक्ट’चा शुभारंभ!

Latest Marathi News Live Update: सहकार कायद्यात काळानुरूप होणार ' बदल ' राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती जाहीर

Nawab Malik Statement :नवाब मलिकांचं मुंबई महापौर पदाबाबत मोठं विधान अन् भाजपवरही साधला निशाणा, म्हणाले...

Mundhwa Land Scam : मुंढवा सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र तारूला दिलासा नाही!

SCROLL FOR NEXT