Anupam Kher And Kamal K Khan
Anupam Kher And Kamal K Khan  esakal
मनोरंजन

मनमोहन सिंगांवर टीका करणारे अनुपम खेर गप्प का, घसरत्या रुपयावर केआरकेचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

भारतीय रुपयाची घसरण जवळपास ८० रुपये प्रति डाॅलरपर्यंत पोहोचली आहे. यामुळे कच्च्या तेलापासून इलेक्ट्रिक उत्पादनापर्यंत आयात, परदेशी शिक्षण आणि प्रवास महाग होण्याबरोबरच महागाईची स्थिती आणि खराब होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष मोदी सरकारवर चौहू बाजूंनी टीका करित आहेत. सोशल मीडियावरही चर्चा सुरु आहे. दुसरीकडे बाॅलीवूड अभिनेता कमाल आर खाननेही (KRK) टीका केली आहे. (Kamal K Khan Ask Anupam Kher Over Sliding Rupee Compare To Dollar)

केआरके ट्विटमध्ये म्हणतात, जेव्हा १ डाॅलर = ५६ रुपये होता तेव्हा मोदीजी पंतप्रधान मनमोहन सिंगजींवर (Manmohan Singh) टीक करत होते. अनुपम खेर (Anupam Kher) मनमोहन सिंग यांच्याविषयी अपशब्द वापरत होते. आज जेव्हा एक डाॅलर = 80.05 झाला तर लोकांच्या तोंडात दही जमा झाली आहे. निर्लज्जपणे गप्प बसले आहेत. याबरोबरच केआरके आणखी एक ट्विट करत म्हणाला, आज कोणालाही रुपयाची किंमतीबाबत काही का वाटत नाही ? किंमती काय आहेत? देशाची अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे? जो-तो हिंदू-मुस्लिम करण्यात व्यस्त आहे. मोदीजीही फेकाफेकी करण्यात व्यस्त आहेत. आणि मी त्यांना दोषही देणार नाही, कारण त्यांना याबाबत काहीच माहीत नाही.

लोकांच्या प्रतिक्रिया

एका यूजरने केआरकेच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना लिहिले की सर, यूएसडीवरुन एयूडीवर एक नजर टाका. एयूडीला सर्वात मजबूत करन्सी मानले जात आहे. मात्र त्याच्या मूल्यात ३ महिन्यांमध्ये कमी काळात १० टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे एयूडीमधून आयएनआर अपेक्षानुसार स्थिर आहे. महागाईमुळेही सर्व चलनात घट होत चालली आहे. मनमोहन नावाच्या यूजरने लिहिले की किती वेळेस कानातले बरेलीच्या बाजारात पडले, किती वेळेस रुपया वर्तमान सरकारच्या काळात घसरला आहे. हर्ष नावाच्या यूजरने लिहिले, वेळेबरोबर सर्वच परिपक्व होतात. आता त्यांना अर्थव्यवस्थेचा विषय समजतो का, त्यामुळे जेव्हा परिपक्व व्हाल तेव्हा तक्रार करणार का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT