Kangana over derogatory tweets against farmers DSGMC sends legal notice 
मनोरंजन

कंगणाची जिरली, शेतक-यांविरोधात बोलणं भोवलं

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - शेतक-यांनी गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. सरकारनं नव्यानं आणलेल्या त्या विधेयकाला त्यांनी न जुमानण्याचे ठरवले आहे. त्यासाठी दिल्लीत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी शेतक-यांवर बळाचा वापर केल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या बाजूनं बोलत शेतक-यांना नावं ठेवणा-या कंगणाला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. 

द दिल्ली शीख गुरुव्दारा मॅनेजमेंट कमिटी (डीएसजीएमसी) यांच्यावतीने ही नोटीस पाठविण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कंगणानं शेतक-यांच्या आंदोलनाच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे ती वादाच्या भोव-यात सापडली होती. अखेर तिला हा वाद भोवला आहे. शेतक-यांच्या विरोधात अपमानास्पद बोलणं यासाठी ही नोटीस पाठविण्यात आली आहे. यापुढे कंगणानं अशाप्रकारची वक्तव्यं न करता शेतक-यांची माफी मागावी अशी मागणी त्या नोटीशीत करण्यात आली आहे.

याविषयची अधिक माहिती डीएसजीएमसीचे अध्यक्ष मजिंदर सिंग सिरसा यांनी शुक्रवारी दिली आहे. कंगणाला शेतक-यांच्या विरोधात केलेले व्टिट डिलिट करण्यास सांगितले आहे. आम्ही कंगणाला तिनं शेतक-यांसाठी जे अपमानास्पद शब्द वापरले त्यासाठी नोटीस पाठवली आहे. तिनं एका शेतकरी आजींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. 100 रुपयांमध्ये शेतकरी आजी त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. अशाप्रकारचं वक्तव्य कंगणानं केलं. त्यानंतर ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली. 

कंगणानं केलेल्या व्टिटमुळे शेतकरी हे देशाच्या विरोधात आहे अशाप्रकारचे चित्र निर्माण झाले आहे. त्यांच्या आंदोलनाला त्या नजरेतून पाहिले जात आहे. त्यामुळे तिनं विनाशर्त माफी मागावी अशी मागणी नोटीशीच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे सिरसा यांनी सांगितले. सीएएच्या विरोधात ज्या आजींनी आपली स्पष्ट भूमिका मांडली अशा बिल्कीस बानो यांच्यावर टीका करण्यास कंगणानं मागे पुढे पाहिले नाही.

बानो यांच्या शाहिनबाग येथील लढयाची देशपातळीवर दखल घेण्यात आली होती. शाहीनबागच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आजी आता दिल्लीतही शेतक-यांच्या बाजूनं उभ्या राहिल्या. अस खोचक व्टिट तिनं केलं आहे. "same Dadi" who featured in Time Magazine was "available in 100 rupees". असंही ती म्हणाली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Tractor Theft : ट्रॅक्टर चोरणारा सराईत गुन्हेगार बीडमध्ये अटकेत; १८० सीसीटीव्ही फुटेजचा तपास घेत वाघोली पोलिसांचा मास्टरस्ट्रोक!

Video: शुभमन गिलला T20 World Cup संघातून का वगळलं? गौतम गंभीरवर प्रश्नांचा भडीमार अन् मग...

Latest Marathi News Live Update : कोलकाता येथील बांगलादेश उच्चायुक्तालयावर मोर्चा

Crime: सून सासऱ्यासोबत दारू प्यायची; मुलाला राग अनावर झाला, भलताच प्रकार उघडकीस आला, काय घडलं?

निवडणूकांच्या रणधुमाळीत राजकारणावर आधारित ‘आणीबाणी’ आता ओटीटीवर प्रदर्शित; कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT