kangana ranaut, karan johar, karan johar movies, kangana ranaut movies SAKAL
मनोरंजन

Kangana Ranaut: त्या चाचा चौधरीने सर्वांसमोर माझ्या... करण जोहरवर कंगनाचे पुन्हा एकदा टिकास्त्र

कंगनाच्या या नवीन इंस्टाग्राम स्टोरीची सगळीकडे चर्चा आहे

Devendra Jadhav

Kangana Ranaut on Karan Johar: सध्या बॉलिवूडमध्ये करण जोहरचे बॉलिवूड स्टार्ससोबत शाब्दिक चकमक रंगलेली दिसतेय. करण जोहर आणि कंगना रानौत गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत.

आता या दोघांचा वाद आणखी विकोपाला गेलाय. कंगनाने करणचा उल्लेख चाचा चौधरी करत त्याला पुन्हा डिवचलं आहे. त्यामुळे कंगना आणि करण जोहर यांच्यातला वाद संपण्याची चिन्हं काय दिसत नाहीत.

(kangana ranaut again criticized Karan Johar on social media)

झालं असं होतं कि.. अनुष्का शर्माच्या व्हायरल व्हिडीओनंतर प्रियंका चोप्राच्या बॉलीवूड विरोधातील वक्तव्यामुळेही करण जोहरला नावं ठेवली गेली होती.

प्रियंका चोप्रानं ब़ॉलीवूड विषयी जे प्रश्न निर्माण केले त्यानंतर नेपोटिझमचा मुद्दा उठला होता आणि इंडस्ट्रीत कसं गळचेपी होते हे देखील समोर आलं होतं.

करण जोहरला या जुन्या व्हिडीओमुळे खूप अवहेलना सहन करावी लागली. पण काहीच दिवसांपूर्वी करण जोहरनं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात त्याच्यावर उठवल्या गेलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्याने दिली.

करणनं लिहिलं होतं कि..''करा..तुम्हाला जेवढे आरोप करायचेत तेवढे करा..मी झुकणाऱ्यातला नाही..खोट्याचे गुलाम बना..आम्ही बोलणाऱ्यांपैकी नाही..कितीही बदनामी करा..कितीही आरोप लावा,आम्ही हार मानणाऱ्यातले नाही..

आमचं यश आमच्या कामात दडलंय,तुम्ही भले तलवारीनं वार करा..आम्ही मान टाकणार नाही..'' अशी पोस्ट करणने लिहिली होती.

आता करणच्या या पोस्टवर कंगनाने त्याला पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिलंय. कंगना लिहिते.. “एक वेळ होता जेव्हा चाचा चौधरी एलाइट नेपो माफियांबरोबर मिळून माझा नॅशनल टीव्हीवर अपमान करत होता. कारण मला इंग्रजी बोलता येत नव्हतं.

आज याची हिंदी पाहून विचार आला की आता तर फक्त तुझी हिंदी सुधारली आहे, आगे आगे देखो होता है क्या,”

असं कंगनाने म्हटलं आहे. कंगनाच्या या नवीन इंस्टाग्राम स्टोरीची सगळीकडे चर्चा आहे. अशाप्रकारे कंगना आणि करण मधील वाद थांबण्याची काही चिन्हं दिसत नाहीत. दोघेही एकमेकांची बाजू मांडताना समोरच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT