Kangana and Hrithik in Assam: हृतिक रोशन आणि कंगना रनौत मधील वाद प्रत्येकाला माहिती आहे. 2016 मध्ये कंगना रनौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद माध्यमांमध्ये चांगलाच गाजला होता.अजुनही काहीना प्रश्न आहे की खरंच कंगना आणि हृतिक रिलेशनशिप मध्ये होते का?(Kangana Ranaut and Hrithik Roshan are BOTH in Assam shooting)
आता कंगना आणि हृतिक एकत्र आले आहेत, हे ऐकून धक्का बसला असेलच. एकत्र आले म्हणजेच कंगना रनौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी'चे चित्रीकरण करण्यासाठी आसाममध्ये गेली आहे तर हृतिक रोशन देखील आसाममध्ये आहे, त्याच्या पुढील 'फाइटर' चित्रपटाच्या शूटिंगसाठी.
कंगनाने चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट केला, "आसाममध्ये नाईट शिफ्ट" या कॅप्शनसह. जाड हिवाळ्यातील कपडे परिधान करून ती बसून मॉनिटरकडे पाहत असताना दिसते.
दरम्यान, हृतिक रोशन देखील त्याच्या आगामी 'फायटर' चित्रपटाच्या शूटिंगसाठी आसाममध्ये आला आहे. आजच, १७ नोव्हेंबर, दीपिका पदुकोण, हृतिक आणि फायटरचे इतर सहकलाकार आसाममधील वॉर स्टारमध्ये सामील होण्यासाठी मुंबईहून रवाना झालेयत अशी पोस्ट सोशलवर केली गेलीय. कंगनाच्या इन्स्टा स्टोरी नंतर आणि हृतिकच्या पोस्टनंतर चर्चेला मात्र उधाण आलंय.
कंगनाचा स्वभाव तर अख्खा बॉलिवूडला माहितीच आहे. आणि ती नेहमीच हृतिक रोशनवर टिका करत असते मग तो मुद्दा सहा बोटांचा असो किंवा दुसरा कोणताही असो.तर आता आसाममध्ये हृतिक रोशनपण आला आहे यावर कंगना शांत बसणार की परत ती हृतिकच्या वाकड्यात जाणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.