Kangana Ranaut Took Jibe on sonam kapoor and karan johar  esakal
मनोरंजन

Kangana Ranaut : 'माझ्या इंग्रजी बोलण्यावरुन उडवली होती थट्टा, आज मी...'

करण जोहरच्या कार्यक्रमात त्यानं प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरला तो प्रश्न विचारला होता.

युगंधर ताजणे

Kangana Ranaut Took Jibe on sonam kapoor and karan johar : करण जोहरच्या कार्यक्रमात त्यानं प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरला तो प्रश्न विचारला होता. तो असा की, तुला चांगले इंग्रजी बोलण्याचे धडे द्यायचे असतील तर त्यात तू कुणाचे नाव सुचवशील, यामध्ये सोनमनं कंगनाचे नाव घेतले होते. त्यावरुन वादाला सुरुवात झाली होती. त्यावर आता कंगनाचं उत्तर समोर आलं आहे.

फिल्म माफियावर कंगनानं कडाडून हल्ला केला आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून मी फिल्म माफियांशी लढते आहे. मला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून माझ्यावर टीका करण्यात आली होती. मात्र आता मी किती मोठी आहे हे कामातून दाखवून दिले आहे. इंग्रजी बोलण्यावरुन कुणी माझी फिरकी घेऊ शकत नाही. त्यावर बोलणे आता कायमचे बंद झाले आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

कंगनानं आपल्या त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, मी जे काही केले आहे ते कुणाची मदत न घेता, मला कुणी गॉ़डफादर नाही. माझे कुणीही बॉलीवूडमध्ये देखील नाही. गेल्या २४ वर्षांपासून मी माझी स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामागील माझा त्याग, संघर्ष आणि मेहनत लोकांनी समजून घ्यावी. मी कुणालाही विनाकारण नावं ठेवत नाही. मी भूमिका घेते यात माझी चूक काय, बाकीचे कलाकार त्यांच्या भूमिकेपासून पळ काढतात.

मी जेव्हा बॉलीवूडमध्ये आले तेव्हा मला अनेक अभिनेत्रींनी नावं ठेवली होती. त्यावरुन टिंगल केली होती. खासकरुन माझ्या इंग्रजी बोलण्याच्या अंदाजावरुन.आज मी कुठे आहे आणि मला नावं ठेवणाऱ्या अभिनेत्री कुठे आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. मला इंग्रजीचे ज्ञान शिकवणाऱ्या मावशा काय करत आहेत, त्यांच्याकडे किती चित्रपट आहेत हा प्रश्न महत्वाचा आहे. असेही कंगनानं म्हटलं आहे.

कंगनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती भारताच्या पहिल्या महिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्यात ती इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तिचा हा चित्रपट २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कंगनाच्या चंद्रमुखी नावाच्या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्याचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT