kangana ranaut, javed akhtar, kangana ranaut news, javed akhtar news, Javed Akhtar on Kangana Ranaut News SAKAL
मनोरंजन

Kangana Ranaut : शेवटी कंगनाला कोर्टात यावचं लागलं!, जावेद अख्तर मानहानी प्रकरण

बॉलीवूडमध्ये कंगनानं आतापर्यत वेगवेगळ्या प्रकारे स्वताला सतत चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

युगंधर ताजणे

Kangana Ranaut Bollywood Actress Javed Akhtar : बॉलीवूडमध्ये कंगनानं आतापर्यत वेगवेगळ्या प्रकारे स्वताला सतत चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ती बऱ्याचअंशी यशस्वीही झाली आहे. तिच्या या आक्रमक बोलण्यामुळेच ती अनेकदा गोत्यातही आली आहे. पण ऐकेल आणि शांत बसेल ती कंगना कसली, याचा प्रत्ययही दिसून आला आहे.

काही महिन्यांपूर्वीचे ते प्रकरण आहे. कंगनानं थेट बॉलीवूडचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्याशीच थेट पंगा घेतला होता. त्यानंतर मात्र अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. कंगना आणि जावेद अख्तर यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरु झाली.

यात कोर्टानं कंगनाला अनेकदा कोर्टात हजर होण्याचे आदेशही दिले होते. मात्र तिनं त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यावर कोर्टानं कंगनाला समन्सही बजावले होते. त्यानंतर कंगना ही महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहिल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Penny Stocks : जादा नफ्याच्या मृगजळामागं धावणं नकोच!

यावेळी कंगनाला न्यायधीशांकडून काही प्रश्न देखील विचारण्यात आले होते. जावेद अख्तर यांनी कंगना राणावत हिच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. याबाबत जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी सांगितले की, अख्तर यांच्या कुटुंबातील एका सदस्याला रुग्णालयात दाखल करावे लागल्यानं त्यांना न्यायालयात हजर राहता आले नाही.

गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ कंगना आणि अख्तर यांच्यातील वाद सुरु आहे. त्यावर कोर्टात सुनावणी देखील होत आहे. यासगळ्यात मात्र कंगनानं अनेकदा वेगवेगळ्या कारणामुळे वाद निर्माण केल्याचे दिसून आले आहे. कंगनानं गेल्या महिन्यात कंगनाने जावेद अख्तर यांच्याविरोधात कोर्टात अपील केले होते. जावेद अख्तर जाणीवपूर्वक कोर्टात हजर राहत नसल्याचे म्हटले होते.

कंगनाचे वकील रिजवान सिद्धीकी यांनी म्हटले होते की, जावेद अख्तर मुद्दाम कोर्टात हजर झाले नाही, त्यामुळे न्यायाच्या हितासाठी त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करावे. कंगनानं अख्तर यांच्यावर छळ केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT