Kangana Ranaut esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: 'फक्त दहा चित्रपट करणाऱ्या कंगनाला 'पद्मश्री', आमची हयात गेली तरी...' टॉलीवूडच्या अभिनेत्रीचा संताप

बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद अजुनही सुरुच आहे. गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या प्रकारे समोर येत राहिला.

सकाळ डिजिटल टीम

Kangana Ranaut bollywood actress Padma Shri: बॉलीवूडची क्वीन म्हणून कंगना रनौतची ओळख आहे. सोशल मीडियावर नेहमीच कंगना वेगवेगळया विषयावर प्रतिक्रिया देताना दिसते. असा एकही विषय नाही की कंगनानं त्यावर आपली प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त केलेली नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन ते देशाचे स्वातंत्र्य अशा विषयांवर कंगना बोलत असते.

बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद अजुनही सुरुच आहे. गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या प्रकारे समोर येत राहिला. वर्षभरापासून बॉलीवूड आणि टॉलीवूड यांच्यातील वादानं चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. वर्षभरामध्ये टॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉलीवूडवर वर्चस्व गाजवल्याचे पाहायला मिळाले. पुष्पापासून झालेली सुरुवात केजीएफ २ पर्यत बॉक्स ऑफिसवर टॉलीवूडनं विक्रमी कमाई केली होती.

Also Read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

यासगळ्यात देशातल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांविषयीची चर्चा व्हायरल झाली आहे. त्यामध्ये टॉलीवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं कंगनाला मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारावर नाराजी व्यक्त केली आहे. केवळ दहा चित्रपट करुन कंगनाला पद्मश्री मिळतो कसा, आमची हयात गेली तरी आम्हाला अजुनही त्या पुरस्कारानं का गौरविण्यात आलेले नाही. अशी खंत जयसुधा यांनी व्यक्त केली आहे. दरवेळी सरकार टॉलीवूडच्या कलाकारांना का डावलते अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे. यापूर्वी देखील टॉलीवूडच्या काही कलाकारांनी याविषयी टोकाची प्रतिक्रिया दिली आहे.

दहा चित्रपटांच्या जोरावर कंगना पद्मश्री मिळवते याला काही लॉजिक आहे का, दुसरी गोष्ट म्हणजे सरकार टॉलीवूडच्या कलाकारांचा विचार करणार आहे की नाही, दरवेळी त्या कलाकारांना का बाजुला लोटले जाते असा प्रश्न आम्हाला सगळ्या टॉलीवूडच्या कलाकारांच्यावतीनं विचारावासा वाटतो. सरकारनं या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. असेही जयासुधन यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT