Kangana Ranaut claims all the negativity around ‘Laal Singh Chaddha’ is curated by Aamir Khan himself
Kangana Ranaut claims all the negativity around ‘Laal Singh Chaddha’ is curated by Aamir Khan himself Google
मनोरंजन

Laal Singh Chaddha वादात कंगनाची उडी; आमिर विरोधात बेताल वक्तव्य, म्हणाली..

प्रणाली मोरे

सोशल मीडियावर लाल सिंग चड्ढा(Laal Singh Chaddha) बॉयकॉट(Boycott) हे सध्या ट्रेंडिग आहे. पण आमिरनं 'माझ्या सिनेमाला बॉयकॉट करू नका' असं सर्वांना आवाहनही केलं आहे. तरीदेखील लोकांचा पारा मात्र चढलेला आहे. काही वर्षांपूर्वी आमिरच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनं,किरण रावनं भारताच्या विरोधात केलेलं वक्तव्य लोकांनी पुन्हा उकरून काढून लाल सिंग चड्ढा विरोधात सूर काढला आहे. त्यामुळे सध्या लाल सिंग चड्ढाच्या बॉक्सऑफिसवरील भविष्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पण या वाहत्या गंगेत हात धवून न घेईल ती कंगना रणौत(Kangana Ranaut) कसली. तिनं आता या वादाचा फायदा घेत आमिर(Aamir Khan) विरोधात मोठा दावा केला आहे.(Kangana Ranaut claims all the negativity around ‘Laal Singh Chaddha’ is curated by Aamir Khan himself)

कंगनानं आपल्या इन्स्टाग्रामवर आमिरच्या लाल सिंग चड्ढावरुन सुरु असलेल्या वादावर आपलं मत नोंदवलं आहे. जे अर्थातच नेहमीप्रमाणे सूडाच्या भावनेतून तिनं नोंदवलं आहे. तिच्या म्हणण्यानुसार,आमिर खाननं स्वतःच सिनेमाची पब्लिसिटी होण्यासाठी हा जुना वाद उकरुन काढला आहे,आणि सिनेमा चर्चेत राहावा म्हणून त्याच्याभोवती वादाचं जाळं पसरवून ठेवलं आहे, तो खरा मास्टरमाईंड आहे या सगळ्यामागचा.

तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''लाल सिंग चड्ढाभोवती सध्या जे काही वादाचं चक्र सुरु आहे ते सगळं आमिरच्या मास्टरमाइंड मधूनच आलेलं आहे. त्याला माहित आहे, कॉमेडी चित्रपटाच्या सीक्वेलशिवाय कोणत्याच सिनेमानं बॉक्सऑफिसवर कमाल दाखवलेली नाही. दाक्षिणात्य सिनेमांनीच बाजी मारलेली आहे. हॉलीवूड रीमेक देखील डब्ब्यात गेलेत. हिंदी सिनेमावाल्यांनी लोकांची नस ओळखायला हवी. फक्त हिंदू-मुस्लिम वाद,प्रेम दाखवलं की झालं असं चालणार नाही. आमिरजींच्या pK सिनेमातून जे दाखवण्याचा प्रयत्न केला धर्माच्या नावाखाली ते तद्दन फसवणूक होती प्रेक्षकांची. कृपया हे बंद करा''. साधारण अशा पद्धतीनं कंगनानं आपल्या पोस्टमधून म्हणण्याचा प्रयत्न करत थेट आमिरवर वार केला आहे.

Kangana Ranaut claims all the negativity around ‘Laal Singh Chaddha’ is curated by Aamir Khan himself

आमिरनं देखील काही दिवसांपूर्वी सिनेमाप्रती केल्या जाणाऱ्या निगेटिव्ह प्रसिद्धी विषयी भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता,''मला खूप वाईट वाटतं, जेव्हा लोकांना वाटतं माझं भारतावर प्रेम नाही. पण हे खरं नाही. काही लोकांनी अशी समजूत करुन घेतली आहे याबद्दल खरंच मला काही कळत नाही असं का होतंय. कृपया,माझ्या सिनेमाला बॉयकॉट करू नका. माझा सिनेमा पहा''.

लाल सिंग चड्ढा हा हॉलीवूडच्या फॉरेस्ट गम्प सिनेमाचा रीमेक आहे. आमिरनं याचे अधिकृत हक्क मिळवण्यासाठी खूप खटाटोप केली आहे. या सिनेमात करिना कपूर, आमिर खान, मोना सिंग,नागा चैतन्य असे कलाकार आहेत. सिनेमा ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रीलीज होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

Shirur Lok Sabha : मतांचा टक्का घसरल्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकणार... शिरूरमध्ये घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

Cannes Film Festival 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलला मेरील स्ट्रीप यांचा सन्मान ; आईला केला पुरस्कार समर्पित

SCROLL FOR NEXT