मनोरंजन

Kangana Ranaut: 'आमिर बॉयकॉट ट्रेंडमुळे नाहीतर, त्याच्या...'

सकाळ डिजिटल टीम

Kangana Vs Aamir Khan news: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही आता भलत्याच कारणामुळे ट्रोल झाली आहे. त्याचे कारण तिनं बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान. कंगना ही नेहमीच तिच्या परखड आणि सडेतोड वक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. यामुळे कंगनाला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

काही महिन्यांपूर्वी आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा हा प्रदर्शित झाला होता. मात्र बॉयकॉट बॉलीवूड ट्रेंडमुळे तो चाहत्यांच्या, प्रेक्षकांच्या रडारवर आला. त्याचा परिणाम लाल सिंग चढ्ढावर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला. याचा परिणाम अक्षयच्या रक्षाबंधन नावाच्या चित्रपटावरही झाला होता. यासगळ्या परिस्थितीवर आता कंगनानं एका मुलाखतीतून भाष्य केले. तिनं आमिरचा लाल सिंग चढ्ढा फ्लॉप होण्याचे कारण सांगितले आहे.

आमिरचा लाल सिंग हा काही बॉयकॉट बॉलीवूडमुळे पडलेला नाही. त्याला आमिर स्वताच जबाबदार आहे. देशाची परिस्थिती काय आहे, देशासमोर कोणते प्रश्न आहे अशावेळी त्यानं आपल्याला या देशामध्ये असहिष्णुता जास्त दिसते. त्यामुळे हा देश सोडून गेला तरं बरं. अशा आशयाचे विधान करुन त्यानं राग ओढावून घेतला होता. त्याचा परिणाम त्याच्या लाल सिंग चढ्ढावर झाल्याचे कंगनानं सांगितले आहे.

शंभर कोटींचे बजेट असणाऱ्या लाल सिंग चढ्ढानं केवळ 88 कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. भारत वगळता अन्य देशात देखील हा चित्रपट फारसा चालला नाही. भारताविरोधात बोलल्यास कोण सहन करेल, आमिरनं त्याच प्रकारचे विधान करुन नेटकऱ्यांचा राग ओढावून घेतला. कलाकारांना सर्व प्रकारचे फायदे हवे असतात. टर्की सारखा देश आपल्या देशांच्या धोरणांवर टीका करत असतो. अशावेळी आपण काय विधान करतो हेही महत्वाचे असल्याचे कंगनानं म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT