payal rohatagi  esakal
मनोरंजन

Lock Upp: 'जिथं राहते तिथं 90 टक्के मुस्लिम पण...', अखेर पायलनं झिशानला...

बॉलीवूडची अभिनेत्री कंगनाचा लॉ(Kangana Ranaut) क अप नावाचा रियॅलिटी शो जोरदारपणे सुरु आहे.

युगंधर ताजणे

Bollywood Actress: बॉलीवूडची अभिनेत्री कंगनाचा लॉ(Kangana Ranaut) क अप नावाचा रियॅलिटी शो जोरदारपणे सुरु आहे. त्याला सोशल मीडियावरुन प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसादही मिळाला आहे, गेल्या अनेक दिवसांपासून लॉक अपची चर्चा (bollywood news) सुरु होती. देशाच्या मनोरंजन क्षेत्रातील जे सर्वात वादग्रस्त सेलिब्रेटी आहे त्यांना कंगनानं या शो मध्ये बोलावलं आहे. (tv entertainnment news) त्यावरुन तो शो देशील सोशल मीडियावर (viral social media news) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. आता या शो मधील स्पर्धक पायल रोहतगीनं झिशान खानची माफी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात कडाक्याची भांडणं झाली होती. त्यावेळी पायलनं तिला काही अपशब्दही वापरले होते. त्यावर पायलनं दिलगिरी व्यक्त केली आहे.

कंगनाच्या लॉक अपनं नेटकऱ्यांमध्ये वेगळ्या प्रकारचा माहौल तय़ार केला आहे. बघता बघता मोठा प्रेक्षकवर्ग या शोनं वाढवला आहे. सुरुवातीच्या काळात राखी सावंतनं कंगनाला हा शो किमान शंभर दिवस सुरु ठेवण्याचे आव्हान दिले होते. मात्र आता कंगनाच्या लॉक अपनं सोशल मीडियावर नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे. पायलच्या आणि झिशानच्या प्रकरणानं लॉक अपमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. पायलनं झिशानला एक वेगळा टास्क दिला होता. त्या दरम्यान त्यांच्यात काही कारणास्तव वाद निर्माण झाले होते. तो वाद टोकाला गेला आणि पायलनं तिला धर्मावरुनही सुनावले.

पायलनं आता झिशानची माफी मागितली आहे. मी रागाच्या भरात जे काही बोलले त्यावरुन मी झिशानची माफी मागते. मला तसे बोलायला नको होते. झिशान माझं बोलणं तुला पटलं नसेल कदाचित पण मी काही तुझ्या धर्माच्या विरोधात नाही. तू त्यावरुन माझ्याबद्दल मत तयार करु नको. झिशाननं पायलला बिंबो अशी हाक मारली होती. त्यावरुन पायलला राग अनावर झाला होता. त्यानंतर तिच्यात आणि झिशानमध्ये वाद निर्माण झाला. सोशल मीडियावरुन त्यांची भांडणं व्हायरल झाली होती. मी ज्याठिकाणी राहते तिथे 90 टक्के मुस्लिम आहेत, पण मी काही त्यांचा व्देष करत नाही. आम्ही सर्व सलोख्यानं राहतो. असेही पायलनं यावेळी झिशानला सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Raksha Andolan: राम मंदिर देणगीप्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार! महाराष्ट्रातून 'राम रक्षा आंदोलना'ची घोषणा; कुठून सुरूवात होणार?

Mumbai News: तापामुळे रुग्णालयात दाखल; सकाळी ठाकरे गटाच्या ३२ वर्षीय नेत्याचा संशयास्पद मृत्यू, तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं

Latest Marathi News Live Update : गोसीखुर्द धरणाचे ३ दरवाजे उघडले; वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Fact Check: वैभव सूर्यवंशीने Laila Faisal ची रिल केली रिपोस्ट; अभिषेक शर्माच्या कथित गर्लफ्रेंडला फॉलो करतोय पठ्ठ्या

Khambatki Ghat Landslide : पुणे–सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात दत्त मंदिराजवळ दरड कोसळली; काही काळ वाहतूक विस्कळीत, सहाव्या वळणावर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT