Kangana Ranaut, Madhavan reunite for pan-India psychological thriller  Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut New Film: कंगना-माधवनची जोडी 8 वर्षांनंतर पुन्हा रंगणार! आगामी सायको थ्रिलर चित्रपटाची घोषणा

कंगनाने तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.

Vaishali Patil

Kangana Ranaut New Film: बॉलिवूडची क्विन म्हणुन ओळखली जाणारी कंगना राणौत ही सध्या तिच्या फ्लॉप चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी तिचा चंद्रमुखी 2 आणि त्यानंतर तेजस हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेला.

त्यामुळे आता तिच्या आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटाची चर्चा आहे. आता त्यातच कंगनाने तिच्या आगामी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे ज्याचे चेन्नईत शूटिंगही सुरू झाले आहे.

कंगना रणौतने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. तिने पूजेचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

यासोबत कंगनाने पोस्टमध्ये लिहिले की, "आज आम्ही चेन्नईमध्ये आमच्या नवीन सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. बाकीची माहितीही लवकरच समोर येईल. सध्या या अतिशय रोमांचक स्क्रिप्टला तुमच्या सर्वांच्या समर्थनाची आणि आशीर्वादाची गरज आहे."

कंगनाच्या या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात तिच्यासोबत आर माधवन काम करणार असल्याच्या चर्चा आहेच. 'तनु वेड्स मनू' आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या चित्रपटात दोघांच्या जोडीने प्रेक्षकांचे खुप मनोरंजन केले होते.

त्यामुळे आता या सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटासाठी हे दोन्ही कलाकार तब्बल 8 वर्षांनंतर एकत्र येणार आहेत. कंगनाने माधवनसोबतचा तिचा जुना फोटो शेअर करत 'तो परत आला आहे' असे म्हटले आहे. त्यामुळे या चित्रपटात त्यांची जोडी जमणार आहे अशी चर्चा सुरु आहे.

कंगनाचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' 24 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कंगनानेच केले आहे.

या चित्रपटात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिकेत दिसणार आहे तर तिच्यासोबत भूमिका चावला, विशाक नायर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, अनुपम खेर आणि मिलिंद सोमण देखील या चित्रपटात दिसणार आहेत. त्याचबरोबर ती 'नोटी बिनोदिनी' या चित्रपटाही काम करणार आहे.

तर दुसरीकडे आर माधवन 'अमेरिकी पंडित', 'टेस्ट', जीडी नायडू बायोपिक, सी शंकरन नायर या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT