Kangana Ranaut On Brahmastra
Kangana Ranaut On Brahmastra Google
मनोरंजन

ब्रह्मास्त्र रिलीजनंतर संपूर्ण टीमविरोधात कंगनाचे आरोप आणि खळबळजनक दावे...

प्रणाली मोरे

Kangana Ranaut On Brahmastra: रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र सिनेमा ९ सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग तेजीत होतेच शिवाय ओपनिंगही दणक्यात झालं.अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. कोणी सिनेमाला लय भारी म्हणताना दिसत आहे तर कुणी सिनेमाला नावं ठेवताना थकत नाहीय. सोशल मीडियावर तर अजूनही बॉयकॉट ब्रह्मास्त्र ट्रेन्डिंगला आहे. आता यादरम्यान कंगना रनौतनं आपलं टीकास्त्र ब्रह्मास्त्र विरोधात सोडलं आहे. तिनं अयान,रणबीर,आलिया आणि करण जोहरची शाळा घेत म्हटलं आहे की अयानला जिनियस(हुशार) जे म्हणत आहेत त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे. ती असं देखील म्हणाली की हे लोक सगळ्याच गोष्टीत बेईमानी करतात,ईमानदारीनं एक सिनेमाही बनवू शकत नाहीत.(Kangana Ranaut On Brahmastra)

कंगना रनौतने इन्स्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे,ज्यामध्ये रणवीर-आलियाच्या ब्रह्मास्त्र सिनेमाचा रिव्ह्यू लिहिलेला आहे. यामध्ये लिहिलं आहे की,''सिनेमा एकदम बकवास आहे. व्हीएफएक्स आणि दिग्दर्शन एकदमच भयानक.एकही सीन पाहून भारावून गेल्यासारखं होत नाही, पण डोकं मात्र नक्की दुखतं''. याच रिव्ह्यू ट्वीटला शेअर करत कंगनानं लिहिलं आहे की,''जेव्हा तुम्ही खोटं विकायला जाता तेव्हा असंच होतं. करण जोहर आपल्या शो च्या प्रत्येक भागात येणाऱ्या गेस्टवर जबरदस्ती करताना दिसतो की त्यांनी आलिया-रणबीरला बेस्ट अॅक्टर्स तर अयानला जीनियस म्हणावं. ६०० करोडच्या बजेट मध्ये ब्रह्मास्त्र सिनेमा बनवलेल्या दिग्दर्शकाकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते,ज्याने आपल्या आयुष्यात एकही चांगला सिनेमा बनवलेला नाही. भारतात फॉक्स स्टुडिओची अवस्था अत्यतं वाईट झाली आहे,या सिनेमाला पैसा पुरवल्यानंतर. या जोकर लोकांमुळे आणखी किती स्टुडिओ बंद होणार आहेत''.

Kangana Ranaut On Brahmastra

बरं एवढ्यावर थांबेल ती कंगना कसली. तिनं आणखी एक स्क्रीन शॉट शेअर करत लिहिलं आहे की,''ब्रह्मास्त्रमुळे ८०० करोडचं नुकसान झालं आहे. त्यांची गटबाजी त्यांच्यावरच उलटली आहे. मीडियाला हाताशी बांधणं,पीआरसोबत लग्नगाठ,केआरकेला जेलमध्ये पाठवणं,रिव्ह्यूज विकत घेणं,बोगस पद्धतीनं तिकीट खरेदी,सगळंच बेईमानीनं करतात,पण ईमानादारी राखून एक चांगला सिनेमा बनवू शकत नाहीत''. इथे माहितीसाटी नमूद करतो की, 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील दावा केला आहे की ब्रह्मास्त्रमुळे ८०० करोड रुपये डूबले आहेत.

Kangana Ranaut On Brahmastra

यानंतर कंगनानं अयान मुखर्जीवर निशाणा साधत म्हटलं आहे की,''जे लोक अयान मुखर्जीला जीनियस म्हणत आहेत,त्यांना लगेच जेलमध्ये टाकायला हवं. त्यानं हा सिनेमा बनवायला १२ वर्ष घेतली. १४ डीओपी बदलले. या सिनेमासाठी ४०० दिवस शूटिंगवर खर्ची घातले. ८५ असिस्टंट डायरेक्टर बदलले आणि ६०० करोड रुपयांची राखरांगोळी केली. तसंच बाहुबलीला मिळालेल्या यशामुळे शेवटच्या मिनिटाला सिनेमाचं नाव जलालुद्दीन रूमी बदलून शिवा ठेवलं,आणि धार्मिक भावनांना कॅश केलं. क्रिएटिव्हिटी काय हे माहित आहे का यांना. आपल्या हव्यासापोठी यशाच्या मागे धावणारे हे लोक यांना जीनियस म्हटंल जातय,मला वाटतं ही विचारपूर्व खेळलेली कपटी खेळी आहे. दिवसाला रात्र आणि रात्रीला दिवस म्हणतायत हे लोकं. हे बेईमानीच''.

Kangana Ranaut On Brahmastra

अयाननंतर कंगनानं करणचीही शाळा घेतली. तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,करण जोहरला सिनेमाच्या स्क्रिप्टपेक्षा लोकांच्या सेक्स लाईफमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यानं हे मान्य केलं आहे की रिव्ह्यूज,स्टार,कलेक्शनचे आकडे,तिकीट्स सगळं खरेदी केलं आहे.

Kangana Ranaut On Brahmastra

यावेळी त्यानं हिंदूवाद आणि बॉलीवूड-साऊथ वॉर या सुरु असलेल्या मुद्द्यांच्या बाबतीत खूप चालाखीनं चाल खेळली आहे. अचानक सज्जनतेचा मुखवटा चढवत त्यानं सगळ्या साऊथवाल्यांना देव्हाऱ्यात बसवत,स्वतः पुजारी बनलाय आणि त्या सगळ्यांकडून सिनेमाचं प्रमोशन करुन घेतलं,अर्थात इथे भीकच मागितली त्याने. सगळं केलं पण चांगला दिग्दर्शक,कलाकार,लेखक त्याला निवडता आले नाहीत. आता ब्रह्मास्त्र सारख्या बकवास सिनेमासाठी इथे-तिथे भीक मागताना दिसत आहे''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT